मुंबई : प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला तिचा प्रियकर राहुल राज सिंगच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. राहुल सिंगचे वकील नीरज गुप्ता यांनी बुधवारी या खटल्यातून आपले वकीलपत्र मागे घेतले. राहुल प्रत्युषाच्या मृत्यूबाबत योग्य माहिती देत नसल्याने मी मानवतावादी दृष्टीकोनातून माघार घेत असल्याचे गुप्ता यांचे म्हणणे आहे. प्रत्युषाची आई सोमा बॅनर्जी यांनी राहुल विरोधात मंगळवारी बांगुरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याला अटकेच्या भितीने राहुलच्या वकिलाकडून बुधवारी अटक पूर्व जामिनासाठी दिंडोशी न्यायालयात अर्ज दाखल केला. ज्यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. त्याचे नवीन वकील हे अशोक सरोगी असणार आहेत.
राहुल राज सिंगच्या वकिलाने घेतली माघार
By admin | Updated: April 7, 2016 02:33 IST