शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपुरुषांची बदनामी करणाऱ्या राहुल गांधींना जेलमध्ये डांबले पाहिजे अन्...; आमदार लोणीकरांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 20:07 IST

लोणीकर म्हणाले, "काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले राहुल गांधी आणि माजी पंतप्रधानांचा मुलगा, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल एवढं घाणेरडं बोलू कसं शकतो? यांच्या डोक्यावर तर परिणाम तर झालेला नाही?"

काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रे दरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्त्यव्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. ठीक ठिकाणी त्यांच्या विरोधात आंदोलने केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी राहुल गांधीवर तीव्र शब्दात हल्लाबोल करत, जाणीवपूर्वक राष्ट्रपुरुषांची बदनामी करणाऱ्या राहुल गांधींना जेलमध्ये डांबले पाहिजे आणि यांची मस्ती आणि माज उतरवला पाहिजे, असे म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी सावरकरांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाष्य करताना लोणीकर म्हणाले, "काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले राहुल गांधी आणि माजी पंतप्रधानांचा मुलगा, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल एवढं घाणेरडं बोलू कसं शकतो? यांच्या डोक्यावर तर परिणाम तर झालेला नाही? यांनी काही नशा तर केलेली नाही? वारंवार जाणीवपूर्वीक महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत, सावरकरांच्या पावन भूमीत, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमित येऊन बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का? यांचा मेंदू सडला आहे का? जाणीवपूर्वक राष्ट्रपुरुषांची बदनामी करणाऱ्या राहुल गांधींना जेलमध्ये डांबले पाहिजे आणि यांची मस्ती आणि माज उतरवला पाहिजे.

मी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विनंती केली आहे, की यांना समाजात दुही निर्माण करायची आहे. यांना राजकारण करायचे आहे आणि जाणीवपूर्वक हा घोडमुंजा ५० वर्षांचा या घोडमुंडाचे लग्नही झालेले नाही. म्हातारा झाला. पण अशा पद्धतीने या वयात ज्येष्ठ, श्रेष्ठ असलेल्या या म्हाताऱ्याने बेताल बडबड करू नये. एवढे जोडे मारले त्यांना  महाराष्ट्रात, एवढे खेटरं मारले, की त्यांच्या शंभर पिढ्यात एवढे खेटरं कुणी खाल्ले नसतील. एवढे खेटरं आणि जोडे राहुल गांधी यांनी खाल्ले. त्यांना जेलमध्ये डांबणं आवश्यक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहेत. त्यांचा अभिमान आम्ही कदापीही सहन करणार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि लोकप्रिय गृहमंत्री यांनी राहुल गांधी यांना जेलमध्ये टाकायलाच हवे, अशी मागणीही लोणीकर यांनी केली आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBabanrao Looneykarबबनराव लोणीकरBJPभाजपा