शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
4
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
5
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
6
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
7
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
8
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
9
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
10
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
11
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
12
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
13
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
14
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
15
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
17
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
18
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
19
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
20
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?

"महाराष्ट्राच्या DNA मध्ये काँग्रेसची विचारधारा", सांगलीतून राहुल गांधींचा भाजपावर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 15:25 IST

Rahul Gandhi in Maharashtra : "सध्या देशात विचारधारेचे युद्ध सुरू आहे. भाजपवाले देशाच्या कानाकोपऱ्यात द्वेष पसरवत आहेत."

Rahul Gandhi in Maharashtra : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज(दि.5) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. सकाळी त्यांनी काँग्रेसचे नांदेडचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यानंतर त्यांच्या हस्ते सांगलीत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा व ‘लोकतीर्थ’ स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

महाराष्ट्राच्या DNA मध्ये काँग्रेसची विचारधारा

"महाराष्ट्र एक पुरोगामी राज्य आहे. येथील लोकांनी देशाला दिशा दिली. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिशा दाखवण्याचे काम केले. महाराष्ट्रात काँग्रेसची मुळे खूप खोलवर रुतलेली आहेत. महाराष्ट्राच्या डीएनएमध्ये काँग्रेसची विचारधारा आहे. त्यामुळे जेव्हा-जेव्हा इथे येतो, तेव्हा मला हा आमच्या विचारधारेचा गड असल्याची जाणीव होते," असे राहुल म्हणाले.

विचारधारेचे युद्ध सुरू"सध्या देशात विचारधारेचे युद्ध सुरू आहे. देशात पूर्वी राजकारण होत होते, पण सद्यस्थितीत फक्त राजकारण नाहीये. एकीकडे काँग्रेस व सर्व महापुरुष आहेत, तर दुसरीकडे भाजप आहे. आम्हाला सोशल प्रोग्रेस हवे आहे, सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे. पण सत्ताधारी पक्षाला निवडक लोकांना पुढे न्यायचे आहे. हे लोक जातव्यवस्थेला खतपाणी घालण्याचे काम करत आहेत. जातीला दुसऱ्या जातीशी लढवतात, द्वेष पसरवतात, अशी टीका राहुल गांधींनी केली.

भाजपने सर्व संस्थांत आपले लोक घुसवलेराहुल पुढे म्हणतात, "भाजपवाले देशाच्या कानाकोपऱ्यात द्वेष पसरवत आहेत. यात काही नवी नाही. ते पूर्वीपासूनच असे करत आहेत. हीच लढाई इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांनी लढली होती. तीच लढाई आज काँग्रेस लढत आहेत. याच महापुरुषांची विचारधारा पाहिली तर त्याचे प्रतिबिंब भारतीय संविधानात दिसते. पण भाजपच्या नेत्यांची संविधान संपवायचे आहे. त्यांनी सर्वच स्वायत्त संस्थांमध्ये आपले लोक घुसवलेत", असा आरोपही राहुल गांधी यावेळी केला.

मोदींच्या माफीनाम्यावर सडकून टीका "चुकीचे काम करणारा माणूसच माफी मागतो. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागितली. मोदींनी माफी का मागितली याची वेगवेगळी कारणे असू शकतात. पहिले कारण म्हणजे या पुतळ्याचे काम संघाच्या कार्यकर्त्याला कंत्राट देण्याचा त्यांना पश्चाताप असावा. त्यामुळे मोदींनी माफी मागितली असावी. दुसरे कारण म्हणजे पुतळ्याच्या बांधकामात भ्रष्टाचार किंवा चोरी झाली असावी. कदाचित त्यामुळे मोदींनी माफी मागितली असावी. तिसरे कारण म्हणजे, त्यांनी महाराजांच्या सन्मानार्थ पुतळा उभा केला, पण तो फार काळ टिकला नाही, म्हणून त्यांनी माफी मागितली असावी", असे राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसSangliसांगली