शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अभिमानस्पद! महाराष्ट्राच्या बीजमाता राहीबाई पोपरे, पोपटराव पवार यांना पद्मश्री जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 22:20 IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या बीजमाता राहीबाई पोपरे आणि अहमदनगरच्या आदर्श  गाव हिवरेबाजाराचे माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

सीड मदर म्हणून राहीबाई पोपरे यांना ओळखले जाते. हायब्रीड वाण आणि रासायनिक शेती यामुळे कुपोषणासहित आरोग्याच्या इतर समस्या वाढल्याने विषमुक्त शेतीसाठी कृतिशील प्रयत्न राहीबाई करतात. शैक्षणिकदृष्ट्या निरक्षर असलेल्या राहीबाई ज्ञानाने खूप समृद्ध आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांना एका कार्यक्रमात राहीबाई पोपरेंचा उल्लेख मदर ऑफ सीड असा केला होता. 

गावरान वाण शोधणे, लागवड करणे, त्यांच्या बिया काढून संकलित करणे,  इतरांना पेरणीसाठी प्रेरणा देणे, त्यांच्या माध्यमातून पुन्हा बियांचे संकलन करणे अशा पद्धतीने त्यांच्या बीजबँकेचा विस्तार सुरू आहे. आतापर्यंत ५४ पिकांच्या ११६ वाणांच्या गावरान बियांचे जतन राहीबाईंनी केले आहे. आईच्या ममतेने दुर्मिळ पारंपरिक गावरान वाणांच्या बियाणांचे जतन करुन त्याची ‘बियाणे बँक ’ बनविणाऱ्या राहीबाई तालुक्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्या तमाम शेतकऱ्यांमध्ये ‘राहीमावशी’ नावाने परिचित आहेत. राहीबाईंनी आपल्या राहत्या घरात कोंभाळणेसारख्या छोट्या खेडे गावात पारंपरिक गावरान वाणांची बियाणे बँक ‘बायफ’ या सेवाभावी संस्थेच्या मदतीने सुरू केलेली आहे. या बँकेतून त्यांनी आत्तापर्यंत हजारो गरजू होतकरू शेतकऱ्यांना गावरान देशी वाणांचा पुरवठा केलेला आहे. गावरान बियाणे संवर्धन प्रचार व प्रसार यामध्ये केलेल्या भरीव कार्यासाठी राहीबाईंना 'लोकमत’ समूहानेदेखील सन्मानित केले होते.

अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. खरीप व रब्बी पिकांसाठी तसेच ग्रामस्थांच्या पिण्यासाठीची वार्षिक गरज तसेच पाळीव जनावरांना पिण्यासाठीची गरज लक्षात घेऊन यंदाच्या पावसाळ्यात गावात पडलेल्या पाण्याचे नियोजन  पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते.

हरियाणा राज्यातील प्रशासकीय अधिकारी व विकास सेवेतील २६ जणांच्या पथकाने देखील आदर्शगाव हिवरे बाजारला भेट दिली होती. गावातील विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी हिवरे बाजार हे दूरदृष्टी नियोजनाचे देशाचे आदर्श असल्याचे मत हरियाणा राज्याचे सचिव डॉ. राजेश खोत यांनी व्यक्त होते.  

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदMaharashtraमहाराष्ट्र