शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘आपल्याच’ राज्यात राधाकृष्णन यांना मताधिक्य कठीण! ‘मविआ’चे ३७, महायुतीचे ३१ खासदार मतदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 14:54 IST

राधाकृष्णन मुंबईचे मतदार; त्यांना पवार-ठाकरेंनी पाठिंबा द्यावा: देवेंद्र फडणवीस

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ‘एनडीए’चे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे मतदार असल्याने ते एकप्रकारे महाराष्ट्राचेच आहेत, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे आहेत, हे गृहीत धरले तरी त्यांना या निवडणुकीत ‘आपल्याच’ राज्यात पिछाडीवर राहावे लागू शकते, असे सध्याचे संख्याबळ सांगते.

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार मतदान करतात. ॲड. उज्ज्वल निकम हे राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य असून, त्यांना या निवडणुकीत मतदानाचा अधिकार आहे. ते भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. 

सध्याचे संख्याबळ पाहता महाविकास आघाडीकडे लोकसभा व राज्यसभा मिळून महाराष्ट्रात ३७ इतके संख्याबळ आहे तर भाजपकडे ३१ खासदार आहेत. 

राज्यात महायुतीचे सरकार असताना आपल्याकडे असलेल्या संख्याबळापेक्षा अधिक मते सी. पी. राधाकृष्णन यांना मिळावीत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार करतील. त्यामुळे उद्या ही निवडणूक झालीच तर काही चमत्कार होईल का, याबाबत उत्सुकता आहे. 

लोकसभेतील संख्याबळ - एकूण खासदार संख्या - ४८

काँग्रेस १३, भाजप ९, उद्धवसेना ९, शरद पवार गट - ८, अजित पवार गट १, शिंदेसेना ७, अपक्ष १ (काँग्रेस समर्थक). महाविकास आघाडी ३१, महायुती १८

राज्यसभेतील संख्याबळ - एकूण खासदार संख्या - २०

भाजप ७, काँग्रेस ३, शरद पवार गट २, उद्धवसेना २, शिंदेसेना १, रिपाइं १, अजित पवार गट ३, राष्ट्रपती नियुक्त १. महाविकास आघाडी ७, महायुती १३ 

राधाकृष्णन मुंबईचे मतदार; त्यांना पवार-ठाकरेंनी पाठिंबा द्यावा : देवेंद्र फडणवीस

उपराष्ट्रपतिपदासाठीचे ‘एनडीए’चे उमेदवार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे-मुंबईचे मतदार आहेत. प्रादेशिक अस्मितेची पाठराखण करणारे उद्धव ठाकरे, शरद पवार या नेत्यांनी त्यांना या निवडणुकीत पाठिंबा जाहीर करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

ते मूळचे तामिळनाडूचे. पण आजच्या तारखेत ते महाराष्ट्राचे मतदार आहेत. विधानसभेवळी राधाकृष्णन यांनी मुंबईत मतदान केले होते. उद्या ते उपराष्ट्रपतिपदाचा अर्ज भरतील तेव्हा ते महाराष्ट्रातील मतदार असल्याचा उल्लेख अर्जासोबत करतील, असे फडणवीस म्हणाले.

इंडिया आघाडीचा वेगळा उमेदवार रिंगणात उतरविल्यास महाविकास आघाडी त्या उमेदवाराला पाठिंबा देणार की महाराष्ट्राची अस्मिता जपत एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन यांना पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPresidentराष्ट्राध्यक्ष