शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

महाराष्ट्रात रॅकेट; ॲझिथ्रोमायसीन-५०० नंतर ॲमॉक्सही बनावट; उत्तराखंडहून येतायत ही औषधे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 08:08 IST

मुख्य आरोपी कारागृहात : उत्तराखंड येथील कंपनीकडून महाराष्ट्रात औषध पुरवठा; सर्वसामान्य रुग्णांच्या जिवाशी खेळ 

- सोमनाथ खताळलोकमत न्यूज नेटवर्कबीड : अंबाजोगाईतील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात ॲझिथ्रोमायसीन ५०० ही गोळी बनावट असल्याचे समोर आले होते. आता ॲमॉक्स ही गोळीही बनावट असल्याचेही उघड झाले आहे. उत्तराखंडच्या मिस्ट्रॉल फॉर्मुलेशन या कंपनीने याचे उत्पादन केले आहे. राज्यात या बनावट गोळ्यांचा पुरवठा करणारा मुख्य आरोपी ठाणे येथील विजय शैलेंद्र चौधरी हा सध्या कारागृहात आहे.

अंबाजोगाईत २५,९०० बनावट गोळ्यांचा पुरवठा केल्याचे औषध प्रशासनाच्या तपासणीतून समोर आले. त्यानंतर चौघांविरोधात अंबाजोगाई शहर पोलिसांत गुन्हा नोंद झाला. या चौघांनी राज्यात ॲझिथ्रोमायसीन ५०० या ८५ लाख गोळ्यांचा पुरवठा केला आहे. अंबाजोगाईच्या महाविद्यालयात कोल्हापूरच्या मे. विशाल एंटरप्रायजेस यांनी पुरवठा केला होता. याच कंपनीने ॲमॉक्सच्याही दीड लाखांहून अधिक गोळ्या खरेदी केल्या होत्या. त्याचा पुरवठा अंबाजोगाईसह नागपूर, ठाणे, वर्धा येथे केल्याचे सांगण्यात आले. आता याच गोळ्या योग्य ते घटक नसल्याने अप्रमाणित केल्या आहेत.   

गोळ्या पुरवठ्याची अशी साखळी मे. काबीज जनरिक हाऊस ठाणे हा बाजारातून बनावट औषधी खरेदी करत होता. तो पुढे मे. ॲक्वेटीस बायोटेक प्रा. लि. भिवंडी यांना द्यायचा तेथून मे. फार्मासिस्ट बायोटेक, सूरत व मे. विशाल एंटरप्रायेजस, कोल्हापूर यांना देत असे. कोल्हापूरच्या कंत्राटदाराकडून शासकीय रुग्णालये, वैद्यकीय रुग्णालय, जिल्हा परिषदअंतर्गत असलेल्या रुग्णालयांमध्ये औषध पुरवठा केला जात होता. त्यांनी पुरवलेल्या गोळ्यांवर उत्तराखंडच्या मिस्ट्रॉल फॉर्मुलेशन या कंपनीचे नाव आहे.

२०२२ पासून  गोळ्यांचा होतोय पुरवठा nमे. विशाल एंटरप्रायजेसचे सुरेश पाटील यांना संपर्क केला असता ते म्हणाले, मागील २७ वर्षांपासून आपण हा व्यवसाय करत आहोत परंतु अशी फसवणूक पहिल्यांदाच झाली. n२०२२ साली आपण विजय चौधरी याच्याकडून औषधी घेतली. परंतु नागपूर, वर्धा आणि ठाणे येथे गोळ्या अप्रमाणित आढळल्यानंतर आपण हा स्टॉक परत घेतल्याचे त्यांनी सांगितले.

अझिथ्रोमायसीन ५०० आणि ॲमॉक्स हे अँटीबायोटिक आहे. हाडांसह इतर वेगवेगळ्या आजारांसाठी या गोळ्या दिल्या जातात परंतु अप्रमाणित आढळलेल्या गोळ्यांमध्ये स्टार्च, कॅल्शियम आणि पावडर असल्याचे समजले. त्यामुळे यांच्यापासून काहीही धोका नाही. - डॉ. अनिल बारकूल,ज्येष्ठ फिजिशियन, बीड  

ॲझिथ्रोमायसीन ५०० ही गोळी अप्रमाणित आढळताच योग्य ती प्रक्रिया करून गुन्हा दाखल केला. यातील मुख्य आरोपी कारागृहात असल्याचे सांगण्यात आल्याने पुढील माहिती मिळत नाही. - मनोज पैठणे, औषध निरीक्षक, बीड

टॅग्स :medicineऔषधंfraudधोकेबाजी