शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘महाज्योती’च्या योजनांच्या नियोजनातील त्रुटींमुळे प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 08:58 IST

पीएच.डी.धारकांच्या समस्या सुटेनात : विद्यार्थ्यांना विद्यावेतनाची प्रतीक्षा

नागपूर : ओबीसी व व्हीजेएनटीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य, गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन आदींसाठी स्थापना करण्यात आलेल्या ‘महाज्योती’द्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या नियोजनातच त्रुटी असल्याने एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. पीएच.डी.धारक, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी, उच्च शिक्षणासाठी आयोजित प्रवेशपूर्व कोचिंग घेणारे विद्यार्थी असोत की यूपीएससीचे विद्यार्थी; या सर्वांकडून ‘महाज्योती’च्या संचालनकर्त्यांवर ठपका ठेवण्यात येत आहे.ओबीसीचे ८० विद्यार्थी यूपीएससीच्या परीक्षेत मुलाखतीसाठी पात्र झाले आहे. महाज्योतीने विद्यावेतन देण्यासाठी ५ ते २५ एप्रिलदरम्यान अर्ज मागितले होते. ८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली; पण विद्यावेतनाबाबत काहीच निर्णय झाला नाही.या आहेत पीएच.डी.धारकांच्या मागण्यामहाज्योतीने संशोधन करण्यासाठी जाहिरात काढली. त्यात अर्ज स्वीकारण्याची तारीख ३० मे होती. लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना कागदपत्र गोळा करणे शक्य झाले नाही. सारथीने मुदतवाढ दिली; पण महाज्योतीने दिली नाही.महाज्योती केवळ २०१९ मध्ये नोंदणी केलेल्या पीएच.डी.धारकांनाच लाभ देणार आहे. त्यापूर्वी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश करावा.सारथीमध्ये संशोधनासाठी ५०० जागा आहेत; पण महाज्योतीत व्हीजेएनटी व ओबीसीचा समावेश असताना केवळ १५० जागा आहेत. किमान ७०० जागा कराव्यात. बार्टी आणि सारथीएवढेच पीएच.डी.धारकांना विद्यावेतन द्यावे.पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणही अपुरेचपोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण १० हजार युवकांना देण्यात येणार होते. चार हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. केवळ १०० विद्यार्थी ऑनलाईन प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षण देणाऱ्यांना अनुभव नाही. प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिन्यांचा होता. त्यात टॅब्लेट देण्यात येणार होते. त्याबाबतचे काहीच नियोजन नाही.पीएच.डी. धारकांच्या समस्या कायमच‘सारथी’ची स्थापना २०१८ मध्ये झाली आणि महाज्योतीचीसुद्धा याच वर्षी नोंदणी झाली. मराठा कुणबी समाजासाठी काम करणाऱ्या सारथीने पीएच.डी.धारकांना सर्व लाभ दिले; पण महाज्योती पीएच.डी.धारकांचे प्रश्नच सोडवू शकली नाही.- किरण वर्णेकर, पीएच.डी.धारकविमुक्त भटक्यांचा केवळ नावापुरता समावेशमहाज्योतीमध्ये विमुक्त भटक्या जातिजमातीचा समावेश आहे. भटक्यांची शैक्षणिक पातळी अत्यल्प आहे. त्यामुळे योजनांचा लाभ केवळ ओबीसीचे विद्यार्थी घेऊ शकतात. मच्छीमार, बेलदार, पारधी, कैकाडी, नाथजोगी, गोसावी, मशानजोगी या जमातींवर संशोधनाचे कार्य होणे गरजेचे आहे.- गजानन चंदावार, संघटक, युवा संघर्ष वाहिनी