शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
3
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
4
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
5
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
6
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
7
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
8
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
9
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
10
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
11
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
12
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
13
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
14
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
15
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
16
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
17
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
18
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
19
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
20
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष

महिला वाहकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: July 6, 2016 23:58 IST

परिवहन महामंडळाच्या बसेस्मध्ये कार्यरत असलेल्या महिला वाहकांच्या विविध समस्यांसोबतच त्यांची सुरक्षितताही धोक्यात येऊ पाहत आहे. मंगळवारी बसमध्ये एका तरुणीची

जळगाव : परिवहन महामंडळाच्या बसेस्मध्ये कार्यरत असलेल्या महिला वाहकांच्या विविध समस्यांसोबतच त्यांची सुरक्षितताही धोक्यात येऊ पाहत आहे. मंगळवारी बसमध्ये एका तरुणीची छेड काढल्याने आता हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. परिवहन महामंडळात साधारण दहा वर्षांपासून महिला वाहक दिसू लागल्या. महिलांचे हे धाडस मानून त्याचे स्वागतही होऊ लागले. मात्र या महिलांच्या अनेक प्रश्नांकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशाच प्रकारे मंगळवारी एका महिला वाहकावर गंभीर प्रसंग ओढावल्याने ही बाब पुन्हा चर्चेत आली आहे.मंगळवारी एका बसमध्ये प्रवास करणाऱ्या वाहक महिलेची (त्यावेळी सदर महिला ड्यूटीवर नव्हती) तरुणाने छेड काढली. हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले. या मध्ये सदर महिला ड्यूटीवर नसली तरी ज्या वेळी महिला वाहक म्हणून आपले कर्तव्य बजावत असतात तेव्हा त्यांचा सर्वाधिक संपर्क प्रवासी असलेल्या पुरुष वर्गाशीच येतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारे असुरक्षिततेचीच भावना असल्याचे सांगितले जात आहे. विनाकारण वाद-विवाद....बसमध्ये प्रवास करणारे प्रवासी वेगवेगळे स्वभाव, वर्तवणुकीचे असतात. यामध्ये कोणी सहकार्यही करतात तर बहुतांश जण त्रास देणारेच असतात. यामध्ये महिला पाहून कोणत्या न कोणत्या कारणाने वाद-विवाद करणारे असतात. मद्यपींचा अधिक त्रास.....बसमध्ये प्रवास करणारी व्यक्ती कशी आहे, हे सांगता येत नाही. त्यात मद्यपान करुन बसणारे बरेच प्रवासी असतात.यामध्ये नशेत अनेकजण महिला वाहकांशी अरेरावी करुन गैरवर्तवणूक करतात. त्यामुळे मद्यपी प्रवाशांचा या वाहक महिलांना अधिक त्रास होत असल्याचे समोर आले आहे. वाहक महिलेची ड्यूटी संध्याकाळी सात पर्यंतच असली पाहिजे, असे असले तरी एखाद्या मार्गावर बस नादुरुस्त झाली तर त्यामध्ये उशीर होऊन रात्र होते. यामध्ये परिवहन महामंडळाचा सहकारी म्हणून केवळ चालकच असतो. मात्र अशा वेळी हा चालक बस दुरुस्त करणार की, महिलेच्या सुरक्षेकडे लक्ष देईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. उपाययोजना.....महिला वाहकांच्या सुरक्षेसाठी एस.टी. प्रशासन काळजी घेते. या सोबतच प्रवाशांनी सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे. या महिला वाहक प्रवाशांच्या सेवेसाठीच असतात, ही भावना जपली पाहिजे, असेही जाणकारांचे म्हणणे आहे. २०० महिला वाहक....जळगाव जिल्ह्यात २०० महिला वाहक कार्यरत आहेत. या महिला नित्यनियमाने सेवा देत असतात. मात्र प्रवाशांकडून निर्माण होणाऱ्या विविध समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते. या सोबतच विश्रामगृह, शौचालय असे अनेक प्रश्नांना ड्यूटीवर असताना महिलांना सामोरे जावे लागते. भरतीचाही विचार केला जाणार महिला वाहकांच्या सुरक्षेचा प्रश्न राज्यभरात समोर येऊ लागल्याने या पुढे भरती करताना महिला तर घ्यायच्या मात्र त्यांना वाहकाचे काम न देता कार्यालयीन काम देण्याच्या विचारात सरकार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले. कारण रात्रीची ड्यूटी, मुक्कामाचे ठिकाण यामुळे अनेक प्रश्न पुढे येऊ लागले आहे. कार्यालयीन कामकाज हवेपरिवहन महामंडळात नियमानुसार ३३ टक्के आरक्षित जागेवर महिला असाव्यात, याला विरोध नाही. मात्र महिला वर्गाला लिपीक, वाहतूक नियंत्रक अथवा इतर कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी द्यावी, असा सूर आता व्यक्त होत आहे. महिला वाहकांच्या सुरक्षेसाठी एस.टी प्रशासन काळजी घेते. मात्र प्रवाशांनीही सहकार्य केले पाहिजे. महिला वाहकांच्या विविध प्रश्नांसदर्भात परिवहनमंत्र्यांची भेट घेणार आहे. - राखी शर्मा, सदस्या, राष्ट्रीय महिला सुरक्षा समिती