शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

मराठा समाजातील वंचित, दुर्बलांच्या विकासासाठी ‘क्वॉलिटी सर्कल’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 1:45 AM

कोल्हापुरात महासंघाच्या बैठकीत निर्णय; राजर्षी शाहू मराठा महोत्सव

कोल्हापूर : उद्योग-व्यवसाय, शिक्षण, कृषी अशा विविध क्षेत्रांतील अनुभवी, गुणवत्तापूर्ण व्यक्तींचा संग्रह (क्वॉलिटी सर्कल) तयार करून त्याद्वारे समाजातील वंचित, दुर्बलांचा विकास साधण्याचा निर्णय शुक्रवारी येथे झाला. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राज्यस्तरीय बैठकीत जिल्हानिहाय मेळावे, जात प्रमाणपत्रांसाठी शिबिरांचे आयोजन, आदींबाबत ठराव केल्याची माहिती महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी दिली.कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवनमध्ये शुक्रवारी राजर्षी शाहू मराठा महोत्सवात महासंघाची राज्यस्तरीय बैठक झाली. बैठकीला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायक पवार, संयुक्त सरचिटणीस दिलीप जगताप प्रमुख उपस्थित होते. कोंढरे म्हणाले, मराठा समाजातील बांधवांनी दुर्बल, वंचितांना विकासासाठी मार्गदर्शन करावे, यासाठी क्वॉलिटी सर्कलची स्थापना केली जाईल. पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र, मुंबईतील अनुभवी, गुणवत्तापूर्ण व्यक्तींचा संग्रह, संघटन केले जाणार आहे. त्याद्वारे समाजाची संघटनात्मक बांधणी केली जाणार आहे. महामंडळाचे उपाध्यक्ष पाटील म्हणाले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज प्रकरणे होत आहेत. थकबाकी हमीला मान्यता दिली आहे. युवक आणि बँकांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी महासंघाने पार पाडावी. महासंघाच्या १९ जिल्हाअध्यक्षांनी त्यांच्या तीन महिन्यांतील कामगिरीचा अहवाल सादर केला. विविध ठराव मंजूर करण्यात आले.बैठकीतील ठराव‘सारथी’ संस्थेचे काम शिवजयंतीपूर्वी सुरू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार.महासंघाचे जिल्हानिहाय मेळावे फेब्रुवारीपासून घेणे.दुष्काळग्रस्त भागातील बांधवांसाठी विविध संस्था, समितींद्वारे मदत करणे.मराठा, कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी शिबिरे घेणे.विद्यार्थ्यांसाठी मराठा शिष्यवृत्ती फंड निर्माण करणे.आरोग्य सेवेच्या मदतीसाठी ट्रस्ट स्थापन करणे.

टॅग्स :marathaमराठा