शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

पां.वा. गाडगीळ, बाबा दळवी स्मृती पुरस्कार जाहीर

By admin | Updated: December 13, 2015 02:24 IST

लोकमततर्फे घेतल्या जाणाऱ्या पत्रपंडित पां.वा. गाडगीळ स्मृती आर्थिक-विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी म.य. उपाख्य बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता स्पर्धेचे निकाल जाहीर झाले आहेत.

नागपूर : लोकमततर्फे घेतल्या जाणाऱ्या पत्रपंडित पां.वा. गाडगीळ स्मृती आर्थिक-विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी म.य. उपाख्य बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता स्पर्धेचे निकाल जाहीर झाले आहेत. हे पुरस्कार नागपूर येथे १६ डिसेंबरला समारंभपूर्वक प्रदान केले जातील. या दोन्ही प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे २०१२ ते १५ या चार वर्षांचे मानकरी जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. या कार्यक्रमात आजची पत्रकारिता व शासन या विषयावर कौन्सिल फॉर इंडियन फॉरेन पॉलिसीचे अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश वैदिक यांचे व्याख्यान आयोजले आहे. लोकमत एडिटोरियल बोर्ड व लोकमत मीडिया प्रा. लि. चेअरमन विजय दर्डा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शालेय शिक्षणमंत्री व लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा असतील. पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे- पां.वा. गाडगीळ आर्थिक-विकासात्मक लेखन स्पर्धा- वर्ष २०१२- प्रथम- अ‍ॅड.कांतीलाल तातेड, नाशिक, वर्ष २०१३- प्रथम-ज.शं. आपटे, पुणे, द्वितीय. वर्ष २०१४- प्रथम - डॉ. नितीन चौधरी, अकोला, द्वितीय-सुनील चव्हाण, पुणे, तृतीय - डॉ. क्रांतिकुमार शर्मा, नांदेड; वर्ष- २०१५- प्रथम - डॉ. जे.एफ.पाटील, कोल्हापूर, द्वितीय - डॉ. वर्षा गंगणे, गोंदिया, तृतीय - बापू अडकिने, परभणी. बाबा दळवी शोधपत्रकारिता स्पर्धा- वर्ष २०१२- प्रथम - हरी विश्वनाथ मोकाशे, लातूर, द्वितीय - सविता देव हरकरे, नागपूर व तृतीय- भालचंद्र कुलकर्णी, अहमदनगर; वर्ष २०१३- प्रथम- संजय देशपांडे, औरंगाबाद, द्वितीय- दिनेश गुप्ता, औरंगाबाद व तृतीय- नरेश डोंगरे, नागपूर; वर्ष २०१४- प्रथम-गणेश देशमुख, अमरावती, द्वितीय- विठ्ठल हेंद्रे, सातारा व तृतीय- संदीप रायपुरे, चंद्रपूर ; वर्ष २०१५- प्रथम- प्रदीप तरकसे, अंबाजोगाई, बीड, द्वितीय- ज्ञानेश्वर भाले, जळगाव व तृतीय- शिवाजी भोसले, सोलापूर. पुरस्कारांचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. परीक्षक म्हणून लोकमतचे समन्वयक संपादक कमलाकर धारप, ज्येष्ठ संपादक ल. त्र्यं. जोशी, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले व लोकमत टाइम्स नागपूरचे वाणिज्य संपादक सोपान पांढरीपांडे यांनी काम पाहिले.