जळगाव : कुर्ला टर्मिनस-राजेंद्रनगर एक्स्प्रेस ही गाडी जळगाव रेल्वे स्थानकातून सुटत असताना साध्या डब्याचे तिकीट असलेल्या उज्ज्वला नीलेश पंड्या (३५) या प्रवासी महिलेस वातानुकूलित डब्यात चढण्यास मज्जाव करून तिकीट तपासनिसाने खाली ढकलल्याने या महिलेचा त्याच रेल्वेखाली सापडून दुर्दैवी मृत्यू होण्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी येथे घडली़ संतप्त नातेवाइकांनी मद्यपी संपत गणपत साळुंखे या तिकीट तपासनिसाला बेदम मारहाण करीत पोलिसांच्या ताब्यात दिले. खंडवा येथील उज्ज्वला पंड्या काही दिवसांपूर्वी जळगाव येथे माहेरी आल्या होत्या. त्या गुरुवारी सकाळी खंडवा येथे जाण्यासाठी निघाल्या. मुलगी पलक (९) हिच्यासोबत निघालेल्या उज्ज्वला यांना सोडण्यासाठी त्यांचा भाचा राहुल पुरोहित सकाळी स्थानकावर आला. पहाटे ५.४५ वाजेच्या सुमारास राजेंद्रनगर एक्स्प्रेसमधील टीसी संपत गणपत साळुंखे (रा. मुंबई) याला त्यांनी एसी थ्री टायर कोचमध्ये जागा उपलब्ध आहे का, याबाबत विचारणा केली. साळुंखे याने या डब्यात जागा उपलब्ध करून दिल्यानंतर पंड्या यांची मुलगी पलक सीटवर जाऊन बसली. दरम्यान, एक्स्प्रेस सुरू झाली. त्या वेळी साळुंखे दरवाजात उभा होता. पंड्या यांनी त्याला बाजूला होण्यास सांगत गाडी पकडण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान साळुंखेने उज्ज्वला यांना गाडीतून खाली ढकलल्याने त्या खाली कोसळल्या. एक्स्प्रेसच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकारानंतर राहुल पुरोहितने आरडाओरड केली. एका प्रवाशाने एक्स्प्रेसची चेन ओढल्याने गाडी थांबली. दरम्यान, संपत साळुंखे हा पॅण्ट्री कारच्या डब्यात जाऊन बसला. स्टेशनमास्टरने उद्घोषणा करीत आरपीएफ पोलिसांना बोलवले. दोन वेळा एक्स्प्रेस मागे-पुढे केल्यानंतर महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात (पान ४ वर)
धावत्या रेल्वेतून महिलेला ढकलले
By admin | Updated: May 30, 2014 01:48 IST