शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’विरोधी आंदोलनाच्या नेत्याकडूनच जमिनीची खरेदी, अल्प मोबदला दिल्याचा ठपका

By यदू जोशी | Updated: November 11, 2017 06:41 IST

समृद्धी महामार्गाच्या विरोधात आंदोलन करीत असलेले बबन हरणे यांनी या महामार्गाच्या परिसरात जमिनींची खरेदी केल्याचे समोर आले आहे.

मुंबई : समृद्धी महामार्गाच्या विरोधात आंदोलन करीत असलेले बबन हरणे यांनी या महामार्गाच्या परिसरात जमिनींची खरेदी केल्याचे समोर आले आहे. त्यासाठी त्याने धाकदपटशा केल्याची तक्रार ठाणे ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे करण्यात आली असून ही शाखा आणि लाचलुचपत प्रतिबंधक खाते या संदर्भात चौकशी करीत आहे.ठाणे जिल्ह्यातील शहापूर भागात समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनास विरोध दर्शवित तेथील शेतकºयांचे नेतृत्व करीत असलेले बबन हरणे यांनी या भागात जमिनी खरेदी केली आहे. काँग्रेस आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हरणे यांच्या आरोपांचे दाखले देत सरकारला वारंवार टीकेचे लक्ष्य केले आहे. मात्र, आर्थिक गुन्हे शाखेकडे झालेल्या तक्रारीत शहापूर तहसिल कार्यालयातील काही अधिकारी, कर्मचाºयांनीही हरणेंच्या नावाखाली जमिनी खरेदी केल्याचे म्हटले आहे.जमिनीची बाजारभावाने किंमत अधिक असतानाही अल्प मोबदला देऊन जमिनी खरेदी केल्याचेही प्रकार घडले असून त्यामुळे एकूणच गूढ वाढले आहे. ‘तुमच्या जमिनी सरकार जमा करून घेईल व तुम्हाला काहीही मिळणार नाही’, असे धमकावून हरणे यांना जमिनी विकण्यास काही अधिकाºयांनी शेतकºयांना भाग पाडल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. खराडे, हेदवली, आसनगावमध्ये घेतलेल्या जमिनींचा उल्लेख करण्यात आला आहे.अरुणसिंग या नागरिकाने ही तक्रार गुन्हे शाखा व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही केली आहे. त्यात बबन हरणे यांनी साईसंसार इमारतीत घेतलेल्या दोन फ्लॅटचाही उल्लेख आहे. या आरोपांबाबत हरणे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता तो स्विच्ड् आॅफ होता.