शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरला आता अहिल्यादेवी यांचे नाव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 05:50 IST

बारामती मेडिकल कॉलेजलाही अहिल्यादेवींचे नाव

चोंडी (अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर करून जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे  नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी चोंडीत केली. बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयालाही अहिल्यादेवींचे नाव देण्याची घोषणा यावेळी केली. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा २९८वा जयंती सोहळा येथे शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत साजरा झाला. व्यासपीठावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, सुजय विखे-पाटील, आमदार राम शिंदे, गोपीचंद पडळकर, अण्णा डांगे, विकास महात्मे आदींची उपस्थिती होती. सोहळ्यात प्रारंभी राम शिंदे व पडळकर यांनी अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराच्या मागणीकडे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. 

आरक्षणाबाबत घोषणाबाजीजयंती उत्सव सोहळ्याला उपस्थित असलेल्या समुदायाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे भाषण सुरू असताना ‘धनगर समाजाला आरक्षण द्या’ अशी घोषणाबाजी केली. मात्र, शिंदे, फडणवीस यांनी भाषणात आरक्षणाबाबत उल्लेख केला नाही. 

नेमके नामकरण काय असणार? गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगरचे नामकरण ‘अहिल्यानगर’ असे करण्याची मागणी केली होती. फडणवीस यांनीही आपल्या भाषणात याच नावाचा उल्लेख केला. मात्र त्यांनी सभेनंतर केलेल्या ट्वीटमध्ये अहमदनगरचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यानगर’ असेल असे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी भाषणात ‘अहिल्यादेवी होळकर’ अशा नावाचा उल्लेख केला तर ट्वीटमध्ये ‘अहिल्यादेवीनगर’ असे म्हटले. त्यामुळे नवीन नाव नेमके काय असणार? याबाबत संभ्रम असून ही बाब शासन आदेशानंतरच स्पष्ट होणार आहे. 

उपमुख्यमंत्र्यांची विनंती अन्...फडणवीस यांनी आपल्या भाषणात ‘सरकारने औरंगाबाद, उस्मानाबादचे नामकरण केले. आता तुमच्या नेतृत्वात या जिल्ह्याचे नामकरण झाले पाहिजे’ असा उल्लेख मुख्यमंत्र्यांना उद्देशून केला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात ही घोषणा केली. ते म्हणाले, ‘अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवींचे नाव देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अहिल्यादेवींचे कर्तृत्व मोठे होते. नामांतरामुळे या जिल्ह्याचे नावही हिमालयाएवढे उंच होणार आहे. गतवर्षी ज्यांनी चोंडीत येऊन राजकारण केले त्यांना आम्ही सत्तेतून घालविले, अशी टिप्पणी त्यांनी शरद पवार यांना उद्देशून केली. 

अहिल्यादेवींची ३००वी जयंती जगाला हेवा वाटेल, अशा पद्धतीने साजरी करू. अहिल्यादेवींच्या नावाने असलेल्या महामंडळासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. धनगर समाजाच्या ज्या छोट्या-मोठ्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या जातील. एकनाथ शिंदेमुख्यमंत्री 

हिंदवी स्वराज्याचा विस्तार अहिल्यादेवींनी देशभर केला. त्यांनी शासनाच्या नव्हे तर स्वत:च्या तिजोरीतून हिंदू धर्मस्थळांचा जीर्णोद्धार केला. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAhmednagarअहमदनगर