शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

रस्सीखेचमध्ये पंजाबचा ‘डबलबार’

By admin | Updated: November 27, 2014 00:14 IST

राष्ट्रीय स्पर्धा : हरियाणा, केरळचा पराभव

सांगली : तगड्या हरियाणा आणि केरळचा धुव्वा उडवत अनुभवी पंजाबने खुल्या विभागातील दोन्ही वजनीगटांचे विजेतेपद आपल्या नावे करत ‘डबलबार’ उडविला. महाराष्ट्रास उपांत्य फेरीतच पराभवाचा धक्का बसल्याने पिछाडीवर रहावे लागले. जिल्हा रस्सीखेच असोसिएशनतर्फे छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये या स्पर्धा पार पडल्या. वेळ, ताकत, कौशल्य आणि दम, आदी चारही गोष्टींचा समतोल साधत अंतिम फेरीतील लढती पार पडल्या. ४८० किलोत पंजाब विरूद्ध हरियाणा असा अटीतटीचा मुकाबला झाला. पहिल्या फेरीत अग्रेसर असणाऱ्या हरियाणाला दुसऱ्या फेरीत पंजाबने खेचत नेवून विजय मिळविला.५०० किलोत केरळ विरूद्ध पंजाब असा मुकाबला झाला. बलाढ्य पंजाबने केरळचे आव्हान पहिल्या फेरीतच संपवण्याचा प्रयत्न केला. अनुभवी पंजाबने केरळचा पराभव करून विजय मिळविला. पारितोषिक वितरण आ. सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी भारतीय रस्सीखेच महासंघाच्या सरचिटणीस माधवी पाटील होत्या. विजय कडणे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुहास व्हटकर यांनी आभार मानले. यावेळी माजी उपमहापौर शेखर इनामदार, युवराज बावडेकर, आशा शिंदे, मदन मोहन, जे़ ए़ गुपीले, राष्ट्रीय प्रशिक्षक राजेंद्र कदम, सागर फडके, गणेश गवळी, ओंकार पाटणकर, विलास गायकवाड, आदी उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी)