शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात ‘सोवळ्या’चा वाद पेटला , मेधा खोलेंवर टीकेचा भडिमार; विविध संघटनांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 04:55 IST

खोटी जात सांगून ‘सोवळे मोडले’ म्हणून स्वयंपाकिणीविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल होताच सर्वत्र तीव्र पडसाद उमटले. फसवणुकीची तक्रार करणा-या हवामान शास्त्र विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा विनायक खोले यांच्यावर सर्वस्तरातून टिकेचा भडिमार

पुणे : खोटी जात सांगून ‘सोवळे मोडले’ म्हणून स्वयंपाकिणीविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल होताच सर्वत्र तीव्र पडसाद उमटले. फसवणुकीची तक्रार करणा-या हवामान शास्त्र विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा विनायक खोले यांच्यावर सर्वस्तरातून टिकेचा भडिमार होत आहे. विविध संघटनांनी आज निदर्शने करत निषेध नोंदविला. तर, सोवळ्याचा संबध शुचिर्भूतता आणि स्वच्छतेशी असून त्याचा जातीशी काहीही संबंध नाही. त्यामुळे डॉ. खोले यांनी दाखल केलेली तक्रार मागे घेऊन हे प्रकरण सामोपचाराने मिटवावे, अशी भूमिका अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने घेतली आहे.‘सोवळं मोडलं’ म्हणून डॉ. मेधा खोले यांनी त्यांच्या घरी स्वंयपाक करणाºया निर्मला यादव (वय ५०) यांच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून राज्यात खळबळ उडाली आहे. यादव यांनी ‘कुलकर्णी’ आडनाव सांगून आपल्याकडे नोकरी मिळवली आणि सुवासिनी आहे, असे सांगून आपल्या घरी स्वयंपाक केला’, अशी तक्रार डॉ. खोले यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री नोंदवली होती. पोलिसांनी यावरून यादव यांच्यावर गुन्हाही दाखल केला आहे. तर ‘मी खोटे नाव सांगून नोकरी मिळवलेली नाही. उलट डॉ. खोले यांनी माझ्या घरी येऊन मला मारहाण केली,’अशी परस्परविरोधी तक्रार निर्मला यादव यांनी अभिरुची पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांची भेट घेऊन खोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ‘देव बाटला, सोवळे मोडले’ म्हणून पोलीस ठाण्यात तक्रार करणाºया डॉ. खोले यांनी संविधानाचा अपमान केला असून त्यांच्याविरुद्धच गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ब्रिगेडने केली. मराठा क्रांती मोर्चा, राष्ट्रवादी काँग्रेसची युवती शाखा, शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने वेधशाळा व डॉ. खोले यांच्या घरासमोर निदर्शने केली. तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव मिलींद देशमुख आणि पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी यादव यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराबाबत माहिती घेतली. या प्रकाराचा अंनिसच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे.सोशल मीडियावरही पडसाद : पुण्यात आज या घटनेचे पडसाद सकाळपासूनच उमटण्यास सुरुवात झाली. सोशल मीडियावर यावरून उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत होत्या. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने दुपारीच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. सोवळ्याचा संबध शुचिर्भूतता आणि स्वच्छता याच्याशी असून, त्याचा जातीशी काहीही संबंध नाही. फसवणुकीचा जो गुन्हा वृद्ध महिलेविरोधात दाखल करण्यात आला त्यांच्या वयाचा विचार करता खोले यांनी तक्रार मागे घ्यावी आणि हे प्रकरण सामोपचाराने मिटवावे ही आमची भूमिका असल्याचे महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष आनंद दवे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे