शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

" पुणे महापालिकेचा राज्यात डंका; कोरोना संकटातही पुणेकरांनी भरला सर्वाधिक मिळकतकर"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 11:44 IST

पुणे महापालिका गेल्या महिन्यात सर्वाधिक मिळकत कर जमा करणारी महापालिका ठरली आहे..

ठळक मुद्देमुंबईलाही टाकले सहाशे कोटींनी मागेपुणे महापालिकेकडे आतापर्यंत ८०० कोटीचा मिळकत कर जमा

लक्ष्मण मोरे-  पुणे : कोरोनाच्या आर्थिक अडचणीच्या काळातही पुणेकरांनी प्रामाणिकपणे आपला मिळकत कर भरला असून राज्यातील २६ महापालिकांमध्ये पुणे महापालिका अव्वल ठरली आहे. ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार पुणेकरांनी गेल्या सहा महिन्यात तब्बल ८०० कोटी रुपयांचा मिळकत कर जमा केला आहे.  देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या तुलनेत हा आकडा ६०० कोटींनी अधिक आहे. मुंबई-ठाणे-नवी मुंबई-नागपुर-नाशिक महापालिकांना पुणेकरांनी मागे टाकले आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर पिंपरी-चिंचवड महापालिका आहे.कोरोनामुळे शासकीय यंत्रणांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. ऐन मार्च महिन्यापासून सुरु झालेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नव्या आर्थिक वर्षाला फटका बसला. याला राज्यातील महापालिका अपवाद ठरल्या नाहीत. राज्यामधील २६ महापालिकांचे यंदाचे उत्पन्न पाहिले असता मोठा आर्थिक फटका बसल्याचे दिसते आहे. मिळकत कर हाच महापालिकांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. कोरोनाच्या साथीमुळे नागरिकांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेकांनी आपले कर अद्याप भरलेले नाहीत.राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपुर, कल्याण-डोंबिवली, ठाणे, औरंगाबाद  आदी महापालिकांच्या मिळकतकराचा आकडा पाहता पुणे सर्वाधिक कर भरणारे शहर ठरले आहे.सांगली-कुपवाड, मालेगाव, भिवंडी, चंद्रपूर या महापालिकांना तर एक कोटींचे उत्पन्नही गाठता आलेले नाही. तर, नातूर आणि नांदेड पालिका पाच कोटींच्या आतच उत्पन्न मिळवू शकल्या आहेत. अहमदनगर, औरंगाबाद, सोलापूर या महापालिका कशाबशा दहा ते वीस कोटींच्या दरम्यान तगल्या आहेत. तर, जळगाव, परभणी, उल्हासनगर आणि अकोला या महापालिकांचे आॅगस्टअखेरीस असलेले मिळकत कराचे उत्पन्न शून्य आहे.====पुणे महापालिकेकडे आतापर्यंत ८०० कोटीचा मिळकत कर जमा झाला आहे.  यंदा बांधकाम विभागाचे उत्पन्न घटले आहे. उत्पन्नाचे मार्ग मर्यादित झाले आहेत. या परिस्थितीतही पुणेकरांनी मात्र पालिका प्रशासनाचा गाडा हाकण्याकरिता साथ देत आपला कर भरला आहे. अन्यथा पालिकेची आर्थिक स्थिती अवघड झाली असती. प्रशासनाकडून येत्या 1 आॅक्टोबरपासून अभय योजना आणण्यात येणार आहे. ही योजना यशस्वी झाल्यास दीड हजार कोटींचे उत्पन्न मिळकत करामधून मिळण्याची अपेक्षा आहे.====पुणेकरांनी कर भरण्याकरिता सर्वाधित ऑनलाईन पद्धतीचा वापर केला आहे. लॉकडाऊनच्या काळातही पुणेकरांनी ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करत आपला मिळकत कर वेळेत भरला आहे. यासोबतच पालिकेचे सेवा केंद्र आणि मुख्य इमारतीमधील नागरिक सहाय्यता कक्षामध्येही नागरिकांनी आपला कर जमा केला आहे. मे आणि जुन या काळात सर्वाधिक म्हणजे ६०० कोटींचा कर जमा झाला आहे.====पुणेकरांनी कोरोनाच्या काळातही गेल्या पाच महिन्यात तब्बल ८०० कोटींचा कर जमा केला आहे. यामध्ये सर्वाधिक कर ऑनलाईन पद्धतीने जमा झाला आहे. पुणे महापालिका गेल्या महिन्यात सर्वाधिक मिळकत कर जमा करणारी महापालिका ठरली आहे. अद्यापही कर भरणा सुरु असून आगामी काळात हे उत्पन्न आणखी वाढेल.- विलास कानडे, प्रमुख, कर आकारणी व कर संकलन विभाग, पुणे महापालिका=====मिळकत करांची महापलिकेनुसार आकडेवारी (आकडे कोटीत)महापालिका उत्पन्न (ऑगस्ट अखेर)मुंबई २१२पुणे ७९९.४८पिंपरी-चिंचवड ३६९ठाणे १३२.१६कल्याण-डोंबिवली १०८.९४नवी मुंबई ७२.८४नागपुर ७१.६४वसई-विरार ५१.४१नाशिक ३९.४३कोल्हापुर ३६.९८सोलापूर २१.६१औरंगाबाद १४.३३अहमदनगर १०.११लातूर ४.१३नांदेड ३.२३अमरावती १.३७धुळे १.२२सांगली-कुपवाड १.१९मालेगाव ०.६३भिवंडी ०.५४चंद्रपुर ०.२५जळगाव ०.००परभणी ०.००उल्हासनगर ०.००अकोला ०.००

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका