शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

विमानतळ बंद असताना पुणे-मुंबई हेलिकॉप्टर सेवा, आजपासून १५ दिवस धावपट्टीची दुरुस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 07:09 IST

Pune-Mumbai helicopter service: १५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या १५ दिवसांच्या काळात पुण्यातील विमानतळ बंद राहणार आहे. मात्र, या काळात ब्लेड इंडिया ही कंपनी आपल्या खासगी विमानतळावरून (व्हर्टिपोर्ट) पुणे ते मुंबई अशी हेलिकॉप्टर सेवा देणार आहे.

नवी दिल्ली : १५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या १५ दिवसांच्या काळात पुण्यातील विमानतळ बंद राहणार आहे. मात्र, या काळात ब्लेड इंडिया ही कंपनी आपल्या खासगी विमानतळावरून (व्हर्टिपोर्ट) पुणे ते मुंबई अशी हेलिकॉप्टर सेवा देणार आहे.ब्लेड इंडियाने जारी केलेल्या एका निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. पुण्याजवळील खराडी येथील ‘पुणे व्हर्टिपोर्ट ते जुहू एअरोड्रोम या दरम्यान ही हेलिकॉप्टर सेवा चालविली जाईल. हे अंतर हेलिकॉप्टरने ४० मिनिटांत पार केले जाईल. पुणे-मुंबई प्रवासाचे भाडे १५,५०० रुपये आणि परतीचे भाडे (रिटर्न फेअर) २९,५०० रुपये (कर वेगळे) असेल.निवेदनात म्हटले की, एका दिवसात दोन हेलिकॉप्टर उड्डाणे  होतील. पुणे-मुंबई हेलिकॉप्टर सकाळी ९.३० वा. आणि दुपारी ३.३० वा. निघेल. मुंबई-पुणे उड्डाणांची वेळ सकाळी १०.३० आणि दुपारी ४.३० अशी असेल.  पुणे विमानतळ बंदच्या काळात हीच एकमेव हवाई वाहतूक सेवा उपलब्ध असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ब्लेड ही अमेरिकी कंपनी असून, ब्लेड इंडिया ही ब्लेड यूएसए आणि दिल्लीतील हंच व्हेंचर यांची भागीदारीतील कंपनी आहे. पुणे विमानतळ धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे. गेल्यावर्षी कोविड लसीच्या वाहतुकीसाठी दुरुस्तीचे काम पुढे ढकलण्यात आले होते.

टॅग्स :AirportविमानतळMumbaiमुंबईPuneपुणे