शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पुणे: नगर नियोजन विभाग 'होपलेस',अशी भुक्कड संस्था मी पाहिली नाही: नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2017 16:37 IST

शहराचे नियोजन करण्यासाठी 20 वर्षे लावणारा नगर नियोजन विभाग हा होपलेस आहे, अशी भुक्कड संस्था मी पाहिली नाही, अशा शब्दात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नगर नियोजन विभागावर जोरदार टीका केली.

ठळक मुद्देशहराचे नियोजन करण्यासाठी 20 वर्षे लावणारा नगर नियोजन विभाग हा होपलेस अशी भुक्कड संस्था मी पाहिली नाही

पुणे, दि. 27 - शहराचे नियोजन करण्यासाठी 20 वर्षे लावणारा नगर नियोजन विभाग हा होपलेस आहे, अशी भुक्कड संस्था मी पाहिली नाही, अशा शब्दात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नगर नियोजन विभागावर जोरदार टीका केली. सिंगापूरच्या धर्तीवर नगर नियोजन झाले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने चांदणी चौकातील उड्डाण पुलासह पुणे जिल्ह्यातील १६ हजार ४३० कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते अनावरण व लोकार्पण करण्यात आले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, आमदार मेधा कुलकर्णी, भीमराव तापकीर, महापौर मुक्ता टिळक उपस्थित होते.

वाहतूक समस्येबाबत पुणे ज्वालामुखीच्या तोंडावर, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींचं मत-

पुणे शहर वाहतूक समस्येबाबत ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. वाहतूक समस्येच्या जोडीला प्रदूषण समस्या शहराला भेडसावत आहे असे मत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

वाहतूक समस्येबाबत पुणे ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. वाहतूक समस्येच्या जोडीला प्रदूषण समस्या शहराला भेडसावत आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची देशात 22 टक्यांनी वाढ झाली आहे पुण्यात यापेक्षाही अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्याला पब्लिक ट्रान्स्पोर्ट ऑन इलेक्ट्रिसिटी शिवाय पर्याय नाही, असे मत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

पैसा ही समस्या नाही अधिकारी काम करत नाहीत ही समस्या आहे. विकासकामांसाठी निधी मोठयप्रमाणात उपलब्ध आहे, मात्र अधिकारी वेळेवर काम करीत नसल्याने काम रखडत असल्याची नाराजी ही नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. तसेच डंडा घेऊन मागे लागल्याशिवाय अधिकारी काम करत नाहीत, अशी टीकाही गडकरी यांनी अधिका-यांच्या कारभारावर केली. पुणे सातारा रस्ता रुंदीकरणाचे रखडलेले काम हा काळा डाग आहे. समस्या आहेत त्या सोडवून  6 महिन्यात काम पूर्ण करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. पुण्याची मेट्रो नागपूरपेक्षा चांगली होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका