शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पुणे: रिक्षातून आईला धक्का देऊन पळवली दहा दिवसाची चिमुकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 18:54 IST

पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. बोपोडी येथे भरदिवसा रिक्षातून एका महिलेने बाळाच्या आईला धक्का देऊन त्यांची दहा दिवसाची मुलगी पळवल्याची घटना उघडकीस आली आहे. 

ठळक मुद्देबोपोडी येथे भरदिवसा रिक्षातून एका महिलेने बाळाच्या आईला धक्का देऊन त्यांची दहा दिवसाची मुलगी पळवल्याची घटना रिक्षामध्ये आधीपासूनच एक महिला प्रवास करत होती. याच महिलेने रेश्मा शेख यांना धक्का देऊन त्यांची 10 दिवसांची मुलगी पळवली. 

पुणे, दि. 16 - पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. बोपोडी येथे भरदिवसा रिक्षातून एका महिलेने बाळाच्या आईला धक्का देऊन त्यांची दहा दिवसाची मुलगी पळवल्याची घटना उघडकीस आली आहे. 

आज सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. रेश्मा शेख (वय 20 रा. दापोडी) बोपोडीतील खासगी रूग्णालयातून एका शेअर  रिक्षात बसून दापोडीकडे  घरी परत येत असताना त्या रिक्षात आगोदर बसलेल्या अनोळखी महिलेने रेश्मा शेखला धक्का मारून रिक्षाबाहेर ढकलून दिले. तिचे दहा दिवसांचे बाळ रिक्षावाल्याच्या मदतीने पळवून नेले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेश्मा शेख या बोपोडीतील एका खासगी रुग्णालयात  रिक्षातून दहा दिवसांच्या मुलीला घेऊन गेल्या. मुलीला रूग्णालयात घेऊन गेल्यानंतर परत येत असताना, शेख शेअर रिक्षामध्ये बसल्या. त्या रिक्षात आगोदरपासूनच एक महिला प्रवास करत होती. त्या रिक्षात बसल्यावर काही अंतर पुढे गेल्यानंतर त्यांना ज्या ठिकाणी उतरायचे होते ते ठिकाण येताच रिक्षावाल्याला पैसे द्यावयाचे असल्याने त्यांनी आपले बाळ जवळ बसलेल्या महिलेकडे दिले. त्यानंतर आरोपी महिलेने शेख यांना जोराचा धक्का दिला, शेख रिक्षातून खाली पडल्या. तेवढ्यात रिक्षावाल्याने रिक्षा सुरू केली. बाळाला घेऊन ती महिला रिक्षातून पळून गेली. हॅरिस पुलाखालील रस्त्याने रिक्षा निघून गेली. शेख यांनी खडकी पोलिसांकडे या प्रकरणी अज्ञात महिलेविरूद्ध फिर्याद दाखल केली आहे. 

बाळाच्या अपहरणात रिक्षावाल्याचाही हात -

बाळाला घेऊन रेश्मा शेख ज्या शेअर रिक्षात बसल्या. त्या रिक्षात आगोदरच बसलेल्या महिलेने शेख यांना धक्का मारून ढकलून दिले. त्याचवेळी रिक्षावाल्याने रिक्षा सुरू केली. बाळाला घेऊन रिक्षा बोपोडी येथील पुलाखालून निघून गेली. रिक्षावाला आणि बाळ पळवून नेणारी महिला यांचे संगनमत असून त्यांनी नियोजनबद्ध कट रचून बाळ पळविले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडकी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली असून आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.