ऑनलाइन लोकमत
पुणे/उंड्री, दि. 4- ई-कॉमर्स कंपनीत पैशाच्या गुंतवणूकीने बसलेला आर्थिक फटका आणि पत्नीशी पटत नसणे या कारणास्तव पिसोळी येथील राहत्या घरी बाप-लेकीने विष पिऊन आत्महत्या केली. फ्लँटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारील रहिवाश्याने पोलिसांना माहिती कळविल्यामुळे हा आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. आत्महत्या करण्यापूर्वी वडिलांनी पाच पानी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना आढळली.
डॉ. किरण देवेंद्र पाटील ( वय 61 रा. किंग्सटन एलिसिया सोसायटी, पिसोळी) आणि नियाता किरण पाटील ( वय 18रा. किंग्सटन एलिसिया सोसायटी, पिसोळी) अशी मृत बापलेकींची नावे आहेत. शेजा-यांना फलँटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी पोलिसांना कळविले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतिश गोवेकर, उपनिरीक्षक पावसे, गणेश कुल्लाळ, रविंद्र भोसले, रमेश राठोड, सचिन शिंदे,विजय गायकवाड, अमोल शिंदे हे घटनास्थळी पोहचले. फ्लँटचा दरवाजा कोणीही उघडत नसल्याचे पाहिल्यावर पोलिसांनी अग्निशामक दलाला पाचारण केले.