शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 06:04 IST

यंदा पहिल्या पाच यशस्वी उमेदवारांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.

नवी दिल्ली/पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या २०२४ मधील परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर केला. यावेळी पहिल्या दोन स्थानांवर मुलींनी बाजी मारली आहे. प्रयागराजची शक्ती दुबे ही अव्वल ठरली आहे, तर हरियाणाच्या हर्षिता गोयलने दुसरे स्थान पटकावले आहे. तर पुण्याच्या अर्चित डोंगरेने तिसरे स्थान मिळविले आहे. एकूण १००९ उमेदवारांची नावे गुणवत्ता यादीत समाविष्ट आहेत. त्यापैकी ९५ विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत.

यंदा पहिल्या पाच यशस्वी उमेदवारांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. पहिल्या २५ उमेदवारांमध्ये ११ महिला आणि १४ पुरुषांचा समावेश आहे. निवड झालेल्या उमेदवारांमध्ये ४५ दिव्यांग व्यक्तींचाही समावेश आहे, ज्यामध्ये १२ अस्थिव्यंगिकदृष्ट्या अपंग, आठ दृष्टिहीन, १६ श्रवणदोष आणि नऊ बहुअपंगत्व असलेले उमेदवार आहेत. यूपीएससीने म्हटले आहे की, शिफारस केलेल्या २४१ उमेदवारांची उमेदवारी तात्पुरती ठेवण्यात आली आहे आणि एका उमेदवाराचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

टॉप १० यशस्वी उमेदवारांत पाच मुलींचा समावेश : १. शक्ति दुबे, २. हर्षिता गोयल, ३. अर्चित पराग डोंगरे, ४. मार्गी चिराग शाह, ५. आकाश गर्ग, ६. कोमल पुनिया, ७. आयुषी बंसल, ८. राज कृष्ण झा, ९. आदित्य विक्रम अग्रवाल, १०. मयंक त्रिपाठी

शक्ती दुबे : तिसऱ्या प्रयत्नात मिळाले यशउत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील शक्ती दुबे टॉपर आहे. अलाहाबाद तिने विद्यापीठातून बी.एससी. केले. त्यात ती सुवर्णपदक विजेती होती. त्यानंतर २०१८ मध्ये बायोकेमिस्ट्रीमध्ये एम.एस्सी केले. यामध्येही ती सुवर्णपदक विजेती होती. नंतर ती स्पर्धा परीक्षांकडे वळली. यूपीएससीत राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध हे पर्यायी विषय घेतले. गेल्या वर्षी ती मुलाखतीपर्यंत पोहोचली होती. मात्र, १२ गुणांनी कट ऑफपासून दूर राहिली. तिसऱ्या प्रयत्नात तिने हे यश मिळविले.

हर्षिता गोयल : सीए झाली; समाजसेवाहीहर्षिता मूळची हरियाणातील हिसारची रहिवासी असून, गेल्या अनेक वर्षापासून गुजरातमधील वडोदरा येथे वास्तव्यास आहे. तिने आपले शालेय शिक्षण वडोदरा येथून केले. यानंतर त्यांनी वडोदरा येथील महाराज सयाजी राव विद्यापीठातून बी. कॉमचे शिक्षण घेतले. हर्षिता सीए आहे. तिने यॅलेसेमिया व कर्करोगग्रस्त मुलांसाठी अहमदाबाद येथील बिलीफ फाउंडेशनबरोबर काम केले आहे. हर्षिता सीए आहे. तिचे पर्यायी विषय आंतरराष्ट्रीय संबंध व राज्यशास्त्र होते.

अचिंत डोंगरे : तत्त्वज्ञान पर्यायी विषय घेतलापुण्याचा रहिवासी असलेला २६ वर्षीय अर्चित हा एक अभियंता आहे. त्याने तामिळनाडूतील वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (व्हीआयटी) मधून बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी) पदवी घेतली आहे. अर्चितने सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत तत्वज्ञान हा पर्यायी विषय घेऊन तिसरा क्रमांक पटकावला. तो तिसऱ्या प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. ध्यानधारणा, स्क्वॅश खेळणे हे त्याचे छंद आहेत.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग