शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

Pulwama Attack: शेवटच्या क्षणी 'तो' मेसेज आला अन् जवानाचा जीव थोडक्यात वाचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 20:18 IST

सीआरपीएफच्या बसमधून ठका बेलकर शेवटच्या क्षणी खाली उतरले

अहमदनगर: सीआरपीएफमधील सहकाऱ्यांसह काश्मीरकडे निघालेल्या जवान ठका बेलकर यांचा जीव एका मेसेजमुळे वाचला. लग्नासाठी सुट्टी मंजूर झाल्याचा मेसेज आल्यानं ठका अगदी शेवटच्या क्षणी बसमधून खाली उतरले. त्यावेळी बसमधील सहकाऱ्यांनी अगदी आनंदात त्यांना निरोप दिला. पुढे याच बसवर दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये बेलकर यांच्या सहकाऱ्यांना वीरमरण आलं. तेव्हापासून बेलकर यांच्या डोळ्यासमोरुन सहकाऱ्यांचे चेहरे जात नाहीत. अगदी हसत, आनंदात त्यांना लग्नासाठी शुभेच्छा देणाऱ्या सहकाऱ्यांच्या आठवणींनी बेलकर यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळत आहेत. पारनेर तालुक्यातल्या गुरवेवाडीमधील गागरेझाप इथं राहणाऱ्या 28 वर्षीय ठका बेलकर सीआरपीएफच्या ७६ व्या बटालियनमध्ये आहेत. 24 फेब्रुवारीला त्यांचं लग्न आहे. त्यासाठी त्यांनी सुट्टीचा अर्ज केला होता. मात्र तो मंजूर झाला नव्हता. त्यामुळे त्यांनी काश्मीरकडे निघण्याची तयारी केली. बसमध्ये जे जवान होते, त्यांच्या यादीत त्यांचा क्रमांक पंधरावा होता. मात्र बस निघण्यापूर्वी त्यांना सुट्टी मंजूर झाल्याचा मेसेज आला. त्यामुळे बस निघण्याच्या अगदी काही मिनिटांपूर्वी ते खाली उतरले. ठका बेलकर बसमधून उतरताच त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं आणि लग्नासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर बस निघून गेली आणि काही वेळातच तिच्यावर दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला घडवल्याची बातमी ठका यांना समजली. आपला जीव थोडक्यात बचावल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मात्र आपल्या सहकाऱ्यांना कायमचं गमावलं असल्याच्या मानसिक धक्क्यातून ते अद्यापही सावरलेले नाहीत. निरोप देणाऱ्या सहकाऱ्यांचे चेहरे आठवून ठका बेलकर यांना अश्रू अनावर होत आहेत.  

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाTerror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरAhmednagarअहमदनगर