शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रक्रिया थांबवून केलं झुरळाचं शुटिंग

By admin | Updated: January 10, 2017 12:56 IST

ठाण्यातील एका हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये झुरळ दिसलं म्हणून डॉक्टरांनी शस्त्रक्रिया थांबवली. यानंतर त्या झुरळाचे शुटिंगही केले.

 ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 10 -  ठाणे शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये एका 45 वर्षीय रुग्णाच्या पायावर शस्त्रक्रिया सुरू होती. मात्र ऑपरेशन थिएटरमध्ये झुरळ फिरताना दिसताच डॉक्टरांनी सुरू असलेली प्रक्रिया थांबवण्याचे आदेश देऊन झुरळाचं शुटिंग करायला सुरुवात केली. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमधील ही घटना आहे. 
 
शस्त्रक्रिया करणा-या डॉक्टरनं असे वागण्यामागील कारणही तितकंच वैध आहे. रुग्णांच्या आरोग्यासंबंधीत कोणताही हलगर्जीपणा होऊ नये, यासाठी ऑपरेशन थिएटरमध्ये सर्वोच्च पातळीवरील स्वच्छता असणे गरजेचं असते. मात्र या हॉस्पिटलमधील अस्वच्छता वारंवार हॉस्पिटल प्रशासनाच्या नजरेस आणून दिल्यानंतरही 'पालथ्या घड्यावर पाणी' असाच काहीसाच प्रकार घडत होता. 
 
अखेर वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर संजय बरानवाल यांनी हॉस्पिटलमधील अस्वच्छता, भयानक परिस्थितीचा पुरावा मांडण्यासाठी ऑपरेशन थिएटरमध्ये वावरणा-या झुरळाचे शुटिंग केले.  'मुंबई मिरर' या वृत्तपत्राने शासकीय हॉस्पिटलमधील अस्वच्छतेच्या भयाण परिस्थितीची माहिती देणारी बातमी दिली आहे.
(आईला भेटण्यासाठी पंतप्रधान मोदींची योगाला दांडी)
 
डॉक्टर संजय बरानवाल 6 जानेवारी रोजी रुग्णावर शस्त्रक्रिया करत असताना त्यांना पुन्हा एकदा हॉस्पिटलमधील अस्वच्छतेचा सामना करावा लागला. या परिस्थितीला कंटाळलेल्या अखेर त्यांनी पुरावाच सादर करायचे ठरवून चक्क शस्त्रक्रिया थांबवून झुरळाचे शुटिंग केले. यापूर्वीही डॉ. बरानवाला यांनी हॉस्पिटलमधील अस्वच्छतेबाबत अनेक तक्रारी केल्या होत्या. यानंतर मागील महिन्यात ठाणे महापालिकेकडून तात्पुरती निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया करण्यात आली.  
(गजबजलेल्या रस्त्यावर विषारी इंजेक्शन टोचून प्रेयसीच्या पतीची हत्या)
 
केवळ बरानवाला यांनीच नाही तर हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टरांसह अन्य कर्मचा-यांनीही किटक, जंतुंमुळे गंभीर समस्या उद्भवल्याचे सांगितले आहे. काही रुग्णांना तर यामुळे संसर्ग झाल्याची माहितीही त्यांच्याकडून मिळली. हॉस्पिटलमधील स्वच्छता मार्गदर्शक तत्त्वानुसार, ऑपरेशन थिएटर प्रत्येक आठवड्यात धुवून स्वच्छ करणं बंधनकारक आहे, पण तसे प्रत्यक्षात घडताना क्वचितच आढळते. 
(जम्मू-काश्मीरमधील चकमकीत दहशतवाद्याचा खात्मा)
 
डॉक्टर बरानवाल यांनी झुरळाचा व्हिडीओ पाठवल्यानंतरही ऑपरेशन थिएटर स्वच्छ करण्यात आले नव्हते, अशी माहिती तेथील डॉक्टर आणि अन्य कर्मचा-यांनी दिली. दरम्यान, हॉस्पिटलच्या डीन सी. मेहता यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देणं टाळले.