मुंबई : स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणारे आणि पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी करणारे समाजसुधारक महात्मा जोतीबा फुले यांचे नाव असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील इमारतीमध्ये विद्यापीठाच्या कर्मचारी संघटनेने ३१ला सत्यनारायणाची महापुजा आयोजित केली आहे. शासकीय आदेश धाब्यावर बसवत कर्मचाऱ्यांनी ही महापुजा आयोजित केल्याने या पुजेला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करावे, अशी मागणी बसपाच्या वतीने राज्यपालांकडे केली आहे. शासकीय कार्यालयांमध्ये धार्मिक कार्यक्रम करु नयेत, असे आदेश शासनाने दिले. हे आदेश धुडकावून विद्यापीठात सत्यनारायणाची महापुजा आयोजित केली जाते. विद्यापीठाच्या संकुलात धार्मिक कार्यक्रम करण्यास विद्यापीठाने शासकीय आदेश डावलून कशी काय परवानगी दिली असा प्रश्न उपस्थित करुन विद्यापीठात आयोजित होणाऱ्या सत्यनारायणाच्या महापुजा आयोजित करण्यावर बंदी घालावी, अशी मागणी बसपाचे प्रज्ञेश सोनावणे यांनी राज्यपालांकडे केली आहे.
महात्मा फुले भवनात सत्यनारायणाची पुजा
By admin | Updated: January 31, 2015 05:27 IST