शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

दहीहंडीत प्रकल्पग्रस्तांची जनजागृती

By admin | Updated: August 26, 2016 02:14 IST

प्रकल्पग्रस्त तरूणांनी सिडको व शासनाच्या अन्यायाविरोधात चळवळ उभारण्यास सुरवात केली आहे.

प्राची सोनवणे,

नवी मुंबई- प्रकल्पग्रस्त तरूणांनी सिडको व शासनाच्या अन्यायाविरोधात चळवळ उभारण्यास सुरवात केली आहे. दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातूनही तरूणांनी लोकनेते दि. बा. पाटील यांची प्रतिमा असलेले होर्डिंग घेवून हंड्यांना सलामी दिली. आमची मागणी एकच हाय, घरे अधिकृत करता की न्हायच्या घोषणा देवून तरूणांनी शहरामध्ये जनजागृती केली. नेरूळ गावातील तरूणांनी दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांच्या चळवळीविषयी जनजागृती करण्याचा हा उपक्रम राबविला. येथील तरूण कार्यकर्ते देवनाथ म्हात्रे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. आम्ही नेरूळकर नावाच्या पथकाने दि. बा. पाटील यांची प्रतिमा हातात घेवून शहरभर रॅली काढली. गोविंदांचा एकच निर्धार प्रकल्पग्रस्तांना घराचा अधिकार, आमची मागणी एकच हाय, घरे अधिकृत करता की न्हाय, आमच्या जागेवरच करणार आमचे घर अधिकृत, फोडू हंडी रचू थरावर थरच्या घोषणा देत शहरवासीयांचे लक्ष गरजेपोटी बांधलेल्या घरांच्या समस्येकडे वेधले. दहीहंडी फोडण्यासाठी मनोरा उभा केल्यानंतर शेवटच्या थरावरील तरूणाच्या हातामध्ये दि. बा. पाटील यांची प्रतिमा व त्यावर आय सपोर्ट पीएपीचा फलक झळकाविला होता. आगरी कोळी युथ फाऊंडेशनने सण व उत्सवांमधून आगरी कोळी संस्कृतीचे व आतापर्यंतच्या लढ्याचे प्रतिबिंब दिसेल असे उपक्रम राबवा असे आवाहन केले होते. संघटनेचे अध्यक्ष नीलेश पाटील यांनीही याविषयी सर्व प्रकल्पग्रस्त तरूणांना आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देवून नेरूळकरांनी राबविलेल्या उपक्रमाचे शहरवासीयांनीही कौतुक केले. नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्त तरूणाईने दि.बा. पाटील यांनी उभारलेली चळवळ वाढविण्याचे व पुढे घेवून जाण्याचा संकल्प केला आहे. प्रत्येक प्रकल्पग्रस्तांना दि. बां. च्या कर्तृत्वाची सखोल माहिती असावी. हुतात्म्यांचे रक्त वाया जात नाही व वाया जावूही द्यायचे नसते हा त्यांचा विचार प्रत्येकामध्ये रूजविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. पूर्ण आयुष्य नि:स्वार्थपणे फक्त आणि फक्त प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी लढण्यात घालविणाऱ्या या लोकनेत्याच्या स्मृती प्रेरणादायी ठरत आहे. सुशिक्षित तरूणही या चळवळीशी जोडला जात आहे. >चळवळीची वाटचाल दहीहंडीबरोबर गणेशोत्सवामध्येही प्रकल्पग्रस्तांच्या चळवळीला उजाळा देणारे उपक्रम राबविले जाणार आहेत. जासईच्या लढाईत शहीद झालेले हुतात्मे, साडेबारा टक्के योजना, सेझ व विमानतळबाधितांसाठी दिलेला लढा, जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांसाठी दिलेल्या लढ्यांविषयी माहिती शहरवासी व प्रकल्पग्रस्तांच्या भावी पिढीपर्यंत पोहचविली जाणार आहे. समाजबांधवांमध्ये जनजागृतीसाठी हे उपक्र म राबविले जात आहेत.