मुंबई : अन्नाची नासाडी टाळा हे सांगण्यासाठी म्हणजेच ‘शून्य अन्ननासाडी’च्या प्रसारासाठी ‘मॉर्फियस क्रिएशन इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे १३ आॅगस्ट रोजी सकाळी नरिमन पॉइंट ते दादर, सायन रुग्णालयमार्गे हुतात्मा चौक अशा मशाल दौडचे आयोजन करण्यात येणार आहे.या ३५ किमीच्या मशाल दौडीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून विकास आमटे उपस्थित राहणार असून, मुंबईचे डबेवाले त्याचे ब्रँड अॅम्बेसेडर असतील. नौकायन क्रीडाप्रकारात आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे दत्तू बबन भोकनळ आणि अर्जुन व द्रोणाचार्य पुरस्कार विजेते संजीवा सिंग यात सहभागी होणार आहेत.धावपटूंसोबतच सामान्य नागरिकांना चार किलोमीटरच्या ‘ड्रीम रन’मध्ये सहभागी होता येईल. मुंबईतील ‘मशाल दौड’सोबत विविध कार्यक्रमांद्वारे महाराष्ट्रातील दहा शहरांमध्ये वर्षभर ‘शून्य अन्ननासाडी’बाबत प्रबोधनाचे काम केले जाणार आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न २५० महाविद्यालयांमध्ये या विषयावर पोस्टर व वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाणर आहे.
मुंबईत मशाल दौड, अन्ननासाडी टाळण्यासाठी जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 04:12 IST