शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

‘ऑपरेशन बुकलेट’मध्ये प्रक्षोभक मजकूर, भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याची ‘पीएफआय’ची तपशीलवार योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 08:04 IST

Operation Booklet : कट्टरपंथी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) अटक केलेल्या सदस्यांकडून जप्त करण्यात आलेल्या आक्षेपार्ह सामग्रीत ‘३६५ डेज थ्रू अ थाऊजंड कटस’ (ऑपरेशन बुकलेट) हा प्रक्षोभक मजकूर असलेला दस्तावेज सापडला

- आशिष सिंहमुंबई :  कट्टरपंथी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) अटक केलेल्या सदस्यांकडून जप्त करण्यात आलेल्या आक्षेपार्ह सामग्रीत ‘३६५ डेज थ्रू अ थाऊजंड कटस’ (ऑपरेशन बुकलेट) हा प्रक्षोभक मजकूर असलेला दस्तावेज सापडला असून, यात भारताच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होईपर्यंत म्हणजे २०४७ सालापर्यंत भारत हे इस्लामिक राष्ट्र कसे करता येईल, याची तपशीलवार योजनाच सादर केली आहे. पीएफआय सदस्यांविरोधातील दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) आरोपपत्रात याचा समावेश आहे. 

खासगी वितरणासाठीचा हा दस्तावेज मुंबईतून अटक करण्यात आलेला आरोपी मजहर याच्या मोबाईलमधून हस्तगत करण्यात आला आहे. यात भारतातील मुस्लिमांचा इतिहास, त्यांची दयनीय अवस्था, अल्पसंख्याक असल्याने भेदभावामुळे होऊ न शकणारी प्रगती, वेगवेगळ्या मुस्लिम संघटनांमधील आपापसांतील विरोध, गुजरातमधील दंगलीनंतर मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारांचा उल्लेख करीत २०४७ सालापर्यंत पाच-पाच वर्षांच्या टप्प्यात कोणकोणती पावले उचलायची, याबाबत संघटनेच्या सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रापासून ते संसदेत आपली ताकद कशी वाढवायची, तसेच व्यवस्थेत प्रत्येक ठिकाणी असलेल्या मुस्लिमाने या लढाईत कसा सहभाग घ्यायचा, याबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यापासून अल्पसंख्याकांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. नरेंद्र मोदी यांची प्रतिमा विकासाचे दूत अशी करण्यात आली असून, गुजरातमधील दंगलीनंतर त्यांची प्रतिमा बदलण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. 

लव जिहाद, घरवापसी nप्रवीण तोगडिया, सुब्रम्हण्यम स्वामी, गिरीराज सिंह, योगी आदित्यनाथ, साध्वी निरंजन ज्योती, स्वाध्वी प्राची, साक्षी महाराज, संजय राऊत या नेत्यांच्या वक्तव्याबाबतही आक्षेप घेण्यात आले आहेत. nलव जिहाद आणि घरवापसीच्या नावाखाली मोहीम चालविली जात असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. एटीएसने तपासातून हाती आलेले प्रक्षोभक मजकुराचे पुरावे, साक्षीदार यांचा समावेश आरोपपत्रात केला असून, खटल्याशी संबंधित महत्त्वपूर्ण बाबींची नोंद घेण्यात आली आहे. - महेश पाटील, उपमहानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक

टॅग्स :terroristदहशतवादीMumbaiमुंबई