शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
3
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
4
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
5
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
6
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
7
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
8
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
9
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
10
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
11
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
12
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
13
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
14
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
15
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
16
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
17
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
18
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
19
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
20
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना

सातव्या वेतन आयोगासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद - वित्तमंत्री मुनगंटीवार यांची माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 06:05 IST

अनेक दिवसांपासून राज्य सरकारी कर्मचा-यांना प्रतीक्षा असलेला सातवा वेतन आयोग लागू करण्याची तयारी सरकारने केली असून त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.

 मुंबई -  अनेक दिवसांपासून राज्य सरकारी कर्मचा-यांना प्रतीक्षा असलेला सातवा वेतन आयोग लागू करण्याची तयारी सरकारनेकेली असून त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. मात्र, यासंदर्भात नेमलेल्या के.पी. बक्षी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर उचित निर्णय घेतला जाईल, असे सांगून अनिश्चितता कायम ठेवली.केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाºयांना पूर्वलक्षी प्रभावाने सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात सरकारनेयापूर्वी अनेकदा घोषणा केली. मात्र, तो कधी लागू करणार, हे जाहीर केलेले नाही. यासंदर्भात शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला. यावर मुनगंटीवार यांनी सांगितले की, वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यास सरकारबांधील आहे.अर्थसंकल्पात तशी तरतूद केली आहे. परंतु यासंदर्भात नेमलेल्या बक्षी समितीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. कर्मचाºयांनात्यांच्या वेतनश्रेणीबाबत १५ मार्चपर्यंत अभिप्राय नोंदवता येतील. सातव्या वेतन आयोगामुळे सरकारी तिजोरीवर दरवर्षी २१ हजार ५३० कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. मान्यताप्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील महिला कर्मचारी व पत्नी नसलेल्या पुरुष कर्मचाºयांना संपूर्ण सेवाकालावधीत काही अटी व शर्तींच्या अधीन राहून बालसंगोपन रजा देण्याबाबत शासन विचार करत आहे, असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.वयोमर्यादेचा निर्णय लवकरच 

सातव्या वेतन आयोगासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद सरकारी कर्मचाºयांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याबाबत नेमण्यात आलेल्या खटुआ समितीचा अहवाल लवकरच अपेक्षित आहे. वयोमर्यादेबाबत दोन मतप्रवाह आहेत. वयोमर्यादा वाढवल्यास रोजगाराच्या संधी हुकतात. त्यामुळे युवकांचा विरोध आहे. तर वयोमर्यादा वाढल्यास कर्मचाºयांच्या अनुभवाचा लाभ मिळू शकतो, असे कर्मचारी संघटनांचे मत आहे. पाच दिवसांचा आठवडा करण्याबाबत कोणतीही समिती शासनाने नेमली नाही, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.संगीत कलाप्रकारांवर५०० रुपयांची सूट♦संगीत कलाप्रकारांवरप्रत्येक तिकिटामागे २५०रुपयांऐवजी ५०० रुपयेकरमाफी केली आहे.♦१५ जानेवारीपासून हानिर्णय अमलात आला आहे.

 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारMaharashtraमहाराष्ट्रBudgetअर्थसंकल्प