लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अमरनाथ यात्रेकरूंवरील भ्याड हल्ला निंदनीय असून, त्यावरून काही जण राजकारण करून हज यात्रेकरू, हज हाउसवर हल्ला करण्याच्या धमक्या देत आहेत. त्यामुळे या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व आमदार अबू आझमी यांनी केली आहे. देशातील सर्व हज हाउसवर पोलीस बंदोबस्त ठेवावा, त्याचप्रमाणे यात्रेकरूंना जाताना व परत येताना सुरक्षेची खबरदारी घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
‘हज हाउस व यात्रेकरूंना सुरक्षा पुरवा’
By admin | Updated: July 14, 2017 05:37 IST