शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जन्मजात किडनी-हृदय रोग्यांना दिव्यांगांचा दर्जा द्यावा : अपंग कल्याण आयुक्तालयाची शिफारस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 07:00 IST

केंद्र सरकारने २०१६मध्ये अपंग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ संपूर्ण देशात लागू केला आहे.

ठळक मुद्देदिव्यांगांना आरोग्य सवलती मिळण्यास शक्य होणारअपंग कल्याण आयुक्तालयाची शिफारस जन्मजात हृदयरोग आणि पॉलिसिस्टीक किडनी विकाराचा देखील करावा समावेश

- विशाल शिर्के-  पुणे : पॉलिसिस्टीक किडनी डिसिज (पीकेडी) आणि जन्मजात हृदय रुग्णांना दिव्यांगांचा दर्जा द्यावा अशी शिफारस अपंग कल्याण आयुक्तांनी राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला केली आहे. या रोगांना दिव्यांगांचा विशेष दर्जा मिळाल्यास आरोग्यासह विविध सोयी सवलती मिळणे शक्य होणार आहे.  केंद्र सरकारने २०१६मध्ये अपंग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ संपूर्ण देशात लागू केला आहे. राज्यात पूर्वी दृष्टीदोष (अंधत्व), शारीरिक दिव्यांगता, मानसिक आजार, बौद्धिक दिव्यांगता, बहुविकलांगता अशा सहा प्रवर्गासाठी दिव्यंगत्व प्रमाणपत्र दिले जात होते. त्यात आणखी १५ प्रवर्ग समाविष्ट केले आहेत. या अधिनियमामध्ये जन्मजात हृदयरोग आणि पॉलिसिस्टीक किडनी विकाराचा देखील समावेश करावा अशी शिफारस तत्कालिन अपंग कल्याण आयुक्त रुचेश जयवंशी यांनी केली आहे. जन्मजात पॉलिसिस्टीक किडनी विकार असणाऱ्या व्यक्तींच्या किडनी आणि यकृताची कार्यक्षमता मंदावते. त्यामुळे संबंधित रुग्णाची मानसिक आणि शारीरिक वाढ देखील खुंटते. या शिवाय उच्च रक्तदाब, थकवा येणे, अशक्तपणा, चक्कर येण्याच्या तक्रारी देखील वाढतात. हिमोग्लोबीनची आणि कॅल्शियमची कमतरता, वारंवार लघवीला येणे, अंगदुखी, डोकेदुखी, पाठदुखी अशा समस्यांना सामोरे जावे लागते सामान्य व्यक्ती प्रमाणे या रुग्णांना धावता आणि उडी मारता येत नाही. तसेच सलग जास्तवेळ काम करणे अथवा जास्त वेळ उभे राहण्यासही त्रास होतो. साधी मोटारसायकल देखील चालविण्यास अशा व्यक्ती अक्षम असतात. अति तीव्र स्वरुपाच्या वेदनेला या व्यक्तींना सामोरे जावे लागते. या रुग्णांना आयुष्यभर वैद्यकीय उपचार घ्यावे लागत असल्याने, या रुग्णांचा समावेश दिव्यांगामध्ये करावा अशी शिफारस अपंग कल्याण आयुक्तालयाने नोव्हेबंर २०१८मध्ये केली आहे. या शिवाय जन्मजात हृदयरोगचा समावेश दिव्यंगांमध्ये करावा अशी मागणी काही रुग्णांकडून सातत्याने करण्यात येत होती. जन्मजात हृदयरोग असलेल्या व्यक्तींना आयुष्यभर उचार घ्यावे लागतात. दिव्यांगांप्रमाणेच परावलंबित असल्याने जन्मजात हृदयरोग असणाºया व्यक्तींना गतीमंद संबोधून त्यांचा दिव्यांगांच्या श्रेणीत समावेश करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तालयाने सामाजिक न्याय विभागाला शिफारस केली आहे. -------------------- पॉलिसिस्टीक किडनी विकार दहा हजार मुलांमागे एकाला होतो - आजारावरील महागडे उपचार आयुष्यभर घ्यावे लागतात-आजारपणामुळे नोकरी मिळविण्यातही ठरतात अक्षम- जन्मजात हृदयरोग्याला घ्यावे लागतात आयुष्यभर उपचार- वारंवार हृदय शस्त्रक्रियांचा असतो धोका-जन्मजात हृदयरुग्णांना गतीमंद संबोधून दिव्यांगांच्या श्रेणीत समावेश करावा 

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकार