शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

महापुरुषांची बदनामी करणाऱ्या विकृत मनोवृत्तीचा संमेलनात निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 13:43 IST

साहित्य संमेलनात १८ ठराव मंजूर : गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळावा

राम शिनगारेभारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरीउदगीर (जि. लातूर) : ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, मातोश्री जिजाबाई आणि शाहू महाराज यांच्याविषयी बदनामीपर लेखन करणारे, व्यक्तिगत पातळीवर सभा-संमेलनात जाहीरपणे विकृत बुद्धीने बोलणाऱ्या विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तींचा तीव्र निषेध करीत असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला. मागील काळात राज्यपालांसह इतरांनी महापुरुषांवर टिप्पणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर हा ठराव घेण्यात आला.साहित्य संमेलनाच्या उद्घाटनात अखिल भारतीय मराठी साहित्य  महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोकणी लेखक दामोदर मावजो यांच्यासमोरच मराठी भाषेची गोव्यात होत असलेली गळचेपी चिंताजनक असल्याचे सांगितले होते. यानंतर ठाले-पाटील यांनी समारोपात गोव्यात मराठी भाषिकांची संख्या अधिक असतानाही कोकणी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला. हा मराठी भाषिकांवरील अन्याय असून, तो गोवा सरकारने दूर करीत मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी करणारा ठराव मांडला. त्यास बहुमताने मंजुरी देण्यात आली. हा ठराव गोवा शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. साहित्य संमेलनात एकूण १८ ठराव मंजूर केले. त्यात केंद्र शासनाने मराठी भाषेला तत्काळ अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, सीमाभागातील मराठी शाळा व महाविद्यालयांना महाराष्ट्र शासनाने आर्थिक मदत करावी, कर्नाटकात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय, गळचेपीचा निषेध, बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषेसाठी स्वतंत्र मराठी विभाग स्थापन करावा,  गोव्यात पणजीत अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र परिचय केंद्राचे पुनरुज्जीवन करावे आदी १८ ठराव मंजूर केले आहेत.

जेम्स लेनचा जाहीर निषेधब्रिटिश लेखक जेम्स लेन याने ‘शिवाजी हिंदू किंग इन मुस्लीम इंडिया’ या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराज आणि मातोश्री जिजामाता यांचा दुष्ट हेतूने अवमान केला. समस्त देशाला वंदनीय महापुरुषांवर हेतुतः बदनामीकारक लेखन करून समाजात असंतोष निर्माण केला. जेम्स लेनसह अशा तत्सम कुप्रवृत्तीच्या  निषेधाचा ठराव महामंडळाचे  डॉ. रामचंद्र काळुंखे यांनी मांडला.

उदगीर जिल्ह्याची निर्मिती कराउदगीरची लोकसंख्या दीड लाख असून, शहरात बाजारपेठ, शैक्षणिक संस्था, जिल्ह्याची उपविभागीय कार्यालये असल्यामुळे जिल्हा करावा, उदगीर परिसरातील देवणी वळू देशभर परिचित असल्यामुळे येथे पशुवैद्यकीय विद्यापीठाची स्थापन करावी, उदगीर किल्ल्यास ‘अ’ दर्जा देण्याची मागणी करणारे ठराव मंजूर करण्यात आले.