शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी खरेदीअभावी कोसळले तुरीचे भाव!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 06:29 IST

तूर बाजारात आली तरी नाफेडची खरेदी केंद्रे राज्यात सुरू झाली नसल्याचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी क्विंटलमागे एकहजार ते बाराशे रुपये कमी दरात सगळीकडे खरेदी सुरू केली

मुंबई : तूर बाजारात आली तरी नाफेडची खरेदी केंद्रे राज्यात सुरू झाली नसल्याचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी क्विंटलमागे एकहजार ते बाराशे रुपये कमी दरात सगळीकडे खरेदी सुरू केली असून त्यामुळे शेतकºयांची लूट होत आहे.केंद्र्र सरकारने यंदा तुरीची आधारभूत किंमत क्विंटलमागे ५ हजार ६७५ रुपये इतकी निश्चित केली आहे. मात्र आधारभूत किमतीने खरेदी करण्यासाठी नाफेडची केंद्रे सुरू झालेली नाहीत. राज्याच्या पणन विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले की तूर खरेदी सुरू करावी, असा प्रस्ताव विभागाकडून १५ दिवसांपूर्वीच केंद्र सरकारला पाठविला आहे. केंद्राने प्रस्तावाला मंजुरी दिलेली नाही.आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी करणाºया व्यापाºयांवर कारवाई करण्याचे आश्वासन मध्यंतरी सरकारने दिले होते. मात्र, व्यापारी सध्या ४५०० ते ४८०० रुपये दराने बिनबोभाटपणे खरेदी करीत आहेत. तूर साधारणत: डिसेंबरमध्ये बाजारात येते हे वर्षानुवर्षे माहिती असतानाही नाफेडची खरेदी केंद्रे जानेवारीअखेर वा फेब्रुवारीअखेर सुरू केली जातात.दरम्यान, तुरीला यावर्षी ५,६७५ रुपये हमीदर जाहीर करण्यात आला आहे; पण खरेदी केंद्रच सुरू झाले नसल्याने या दराचे करायचे काय, असा प्रश्न शेतकºयांसमोर आहे.मुद्दाम विलंब केल्याचा शेतकºयांचा आरोपगेल्यावेळी १ फेब्रुवारी ते १५ जून २०१८ दरम्यान नाफेडने एकूण ३३ लाख ६५ हजार क्विंटल तुरीची खरेदी केली होती. यंंदा त्याच्या आधीच खरेदी सुरू होईल, असा विश्वास पणन विभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला. नाफेडवर खरेदीचा बोजा येऊ नये म्हणून मुद्दाम खरेदी विलंबाने सुरू केली जाते, असा शेतकºयांचा आरोप आहे.तुरीला हमीभावापेक्षा कमी दर : यावर्षी तुरीचे उत्पादन घटले असून, बाजारात तुरीचे दर सध्या सरासरी प्रतिक्ंिवटल ४,४०० रुपये आहेत. हमीदरापेक्षा हे दर १,२७५ रुपयांनी कमी आहेत.

टॅग्स :agricultureशेती