शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

राज्यातील प्रत्येक विमानतळाच्या १०० किमी परिघात हेलिपॅड उभारण्याचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 03:06 IST

अपघात, वैद्यकीय आणीबाणीच्या किंवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी तातडीने विविध सुविधा उपलब्ध होण्यासाठी हवाई मार्गाने जोडले जाणे गरजेचे आहे.

- खलील गिरकर मुंबई : राज्यातील नागरिकांना आणीबाणीच्या वेळी प्रसंगी हवाई सेवा उपलब्ध होण्यासाठी दीड ते दोन तासांपेक्षा जास्त प्रवास करावा लागू नये, यासाठी प्रत्येक विमानतळाच्या १०० किमीच्या परिघात किमान एक हेलिपॅड उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी आवश्यक प्रक्रिया राबवण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी ‘लोकमत’ला दिली.अपघात, वैद्यकीय आणीबाणीच्या किंवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी तातडीने विविध सुविधा उपलब्ध होण्यासाठी हवाई मार्गाने जोडले जाणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्यात विमानतळाच्या परिघातील मोठ्या तालुक्याच्या ठिकाणी हेलिपॅड किंवा हेलिपोर्ट उभारण्याचा एमएडीसीचा विचार आहे. मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रात नवीन हेलिपॅड उभारण्यासाठी कंपनीने इच्छुकांकडून प्रस्ताव मागवले होते. सागरी मार्ग न्यायालयीन प्रक्रियेत अडकला असल्याने एमएमआरडीएने विरार-अलिबाग कॉरिडॉरमध्ये याबाबत तरतूद करून त्यानंतर पुढील प्रक्रिया करण्याचे ठरवले आहे, असे काकाणी यांनी स्पष्ट केले.सिंधुदुर्ग विमानतळ मार्चपर्यंत सुरू होणार२०१६ पर्यंत राज्यात मुंबई, नागपूर, पुणे व औरंगाबादला विमानतळ कार्यरत होते. तीन वर्षांत राज्यात शिर्डी, जळगाव, नाशिक, कोल्हापूर व नांदेड येथे विमानतळ कार्यान्वित करण्यात यश आले. पुढील पाच वर्षांत आणखी सहा विमानतळे कार्यान्वित करण्याचे ध्येय असून ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती काकाणी यांनी दिली. त्यापैकी सिंधुदुर्ग येथील विमानतळ (चिपी) मार्च २०२० पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी आॅगस्टपर्यंत अमरावती, त्यानंतर पुरंदर, चंद्रपूर, नवी मुंबई, रत्नागिरी विमानतळाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.