शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

लाचखोरांची मालमत्ता गोठविण्याचा प्रस्ताव

By admin | Updated: March 31, 2015 03:33 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सुरू केलेल्या लाचखोरांच्या चौकशीप्रकरणी राज्यातील विविध सरकारी विभागांतील ३० जणांची ३४ कोटींची अपसंपदा गोठविण्यासाठीचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला आहे.

जळगाव : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सुरू केलेल्या लाचखोरांच्या चौकशीप्रकरणी राज्यातील विविध सरकारी विभागांतील ३० जणांची ३४ कोटींची अपसंपदा गोठविण्यासाठीचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला आहे.एसीबीने महसूल, सार्वजनिक बांधकाम, महानगरपालिका, समाजकल्याण, पाटबंधारे, जिल्हा परिषद, शिक्षण, विक्रीकर, आरोग्य आदी विभांगातील लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांंच्या अपसंपदेची चौकशी सुरू केली आहे. महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागात सर्वाधिक भ्रष्टाचारी अधिकारी आढळले आहेत. महसूल विभागातील एकूण आठ प्रकरणांमध्ये तीन कोटी ७१ लाख ७८ हजार ६०३, तर सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच प्रकरणांमध्ये तीन कोटी ६१ लाख ८१ हजार ३४१ रुपयांची मालमत्ता गोठविण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.नोंदणी विभागातील एका प्रकरणाची चौकशी सुरूअसून, त्यात तब्बल २० कोटी १४ लाख ७३ हजार ६९५ रुपयांची मालमत्ता जप्त करण्याची विनंती शासनाकडे केली आहे. वक्फ बोर्डाच्या एका प्रकरणात तीन कोटी ७ लाख ४९ हजार ३४० रुपयांची मालमत्ता गोठविण्याची शिफारस आहे.जळगावमध्ये दोन जणांच्या मालमत्ता गोठविण्याच्या हालचाली सुरूआहेत. भडगाव तालुक्यातील आश्रमशाळेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर त्यांच्या मालमत्तेची चौकशी सुरू आहे. दोन्ही प्रकरणांतील आरोपींना मालमत्तेची विक्री करण्याची परवानगी देऊ नये, अशी विनंती एसीबीने न्यायालयाकडे केली आहे. (प्रतिनिधी)