शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

केवळ खुल्या प्रवर्गातच बढती, आदेश निघाला : आरक्षणातील बढत्या प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 01:27 IST

मागासवर्गीयांना बढतीमध्ये आरक्षण देण्याची बाब न्यायप्रविष्ट असल्याने, पुढील आदेश होईपर्यंत केवळ खुल्या प्रवर्गातच बढती द्यावी, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढले आहेत. बढतीच्या कोट्यातील पदे भरण्याबाबत विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

- यदु जोशीमुंबई : मागासवर्गीयांना बढतीमध्ये आरक्षण देण्याची बाब न्यायप्रविष्ट असल्याने, पुढील आदेश होईपर्यंत केवळ खुल्या प्रवर्गातच बढती द्यावी, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढले आहेत. बढतीच्या कोट्यातील पदे भरण्याबाबत विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.सर्वोच्च न्यायालयाने एम. नागराज प्रकरणी दिलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा किंवा कसे, याबाबत खंडपीठाने २६ सप्टेंबर २०१८ रोजी अंतिम निर्णय दिलेला आहे. तथापि, बढत्यांमधील आरक्षण रद्द ठरविण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध विशेष याचिका सरकारने सर्वोच्च न्यायालयात केलेली आहे. त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे पदोन्नतीच्या कोट्यातील बिंदुनामावली तपासून केवळ खुल्या प्रवर्गातील पदे पुढील आदेश होईपर्यंत भरण्यात येणार आहेत.बढत्यांमधील आरक्षणाचा विषय शासनाने एकप्रकारे प्रलंबित ठेवला आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना कास्ट्राइबचे नेते कृष्णा इंगळे म्हणाले की, मागासवर्गीयांना बढत्यांमध्ये आरक्षण नाकारण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. एम.नागराज प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने बढत्यांमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याची भूमिका शासनाने घ्यायला हवी. बढत्यांमधील आरक्षणास आव्हान देणारे याचिकाकर्ते हनुमंत गुणाले म्हणाले की मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करुन शासनाने बढत्यांमधील आरक्षण १०० टक्के बंद केले पाहिजे. केवळ खुल्या प्रवर्गातील बढत्यांचा मार्ग मोकळा करण्याची सामान्य प्रशासन विभागाने घेतलेली भूमिका ही उच्च न्यायालयाच्या आदेशास छेद देणारी आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र