शहरं
Join us  
Trending Stories
1
लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा भाग मानू नका, कर्नाटकात जात सर्वेक्षणापूर्वी मोठी मागणी
2
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
3
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
4
Maratha Reservation: दसरा मेळाव्यात सरकारविरोधात...; हैदराबाद गॅझेटवरून जरांगेंचा सरकारला इशारा
5
GST Updates: रोजच्या वापराच्या वस्तू होणार स्वस्त; कर कपातीचा लाभ थेट ग्राहकांना मिळणार
6
Donald Trump: "हा शेवटचा इशारा, नाही तर...", डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कुणाला दिली धमकी?
7
"मी 'सिंगल मदर' नाही...", एक्स पतीच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री; ईशा देओलची पहिली प्रतिक्रिया
8
दहशतवादी कट प्रकरणात मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये एनआयएची धाड
9
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२३,५०८ चं फिक्स व्याज, गॅरेंटीसह मिळेल रक्कम
10
W W W ... पाकिस्तानच्या मोहम्मद नवाजची हॅटट्रिक, Asia Cupआधी उडवली फलंदाजांची झोप
11
Post Office च्या 'या' स्कीममध्ये वर्षाला ₹५०,००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळतील १३ लाख, व्हाल मालामाल
12
ट्रम्प यांच्या टॅरिफ'वर तोडगा काढण्यासाठी भारत अन् युरोपियन युनियन एकत्र! 'एफटीए'सह अनेक मुद्द्यांवर विशेष प्लान बनवला
13
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
14
"गुजरातवरुन आणलेला महागडा तराफा राजाला आवडला नसेल...", 'लालबागचा राजा' विसर्जनावरुन मराठी अभिनेत्रीची खोचक पोस्ट
15
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
16
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
17
जेद्दाह किनाऱ्याजवळ केबल तुटली, इंटरनेटचा स्पीड झाला कमी
18
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
19
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
20
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था

एमपीएससी परीक्षेतूनच मिळवली पदोन्नती

By admin | Updated: March 17, 2017 02:21 IST

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आई-वडील आणि लहान भावाच्या पाठिंब्यामुळे शिक्षकी पेशानंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून बुलढाणा जिल्ह्यातील

पुणे : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आई-वडील आणि लहान भावाच्या पाठिंब्यामुळे शिक्षकी पेशानंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून बुलढाणा जिल्ह्यातील संजयकुमार ढवळे याने उपजिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे. राज्य सेवा परीक्षेतून सलग तीन वर्षात नायब तहसिलदार, तहसिलदार आणि उपजिल्हाधिकारी ही पदे मिळवून त्याने परीक्षेच्या माध्यमातून गुणवत्ता सिध्द करत पदोन्नती मिळवली आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य सेवा (मुख्य) परीक्षेचा अंतिम निकाल गुरूवारी जाहीर झाला आहे. उपजिल्हाधिकारी पदाच्या पाच जागांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत संजयकुमार ढवळे याने ओबीसी संवर्गातून प्रथम क्रमांक पटकवला आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या संजयकुमार याने मोठ्या जिद्दीने दरवर्षी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एका पद मिळवले.नायब तहसिलदार पदावरून उपजिल्हाधिकारीपदापर्यंत पदोन्नती मिळवण्यासाठी १५ वर्षाहून अधिक कालावधी लागतो. मात्र , संजयकुमार ढवळे याने २०१४ मध्ये नायब तहसिलदार, २०१५ मध्ये तहसिलदार आणि २०१६ मध्ये उपजिल्हाधिकारी पद मिळले. नारायण पेठेतील गोगटे प्रशालेतील अभ्यासिकेत संजयकुमार याने परीक्षेची तयारी केली.तसेच अभिजित मेंगडे,मृणाल जाधव आणि प्रकाश पोळ यांनीही गोगटे प्रशालेत अभ्यास करून यश मिळवले आहे.संजयकुमार दळवी म्हणाला, आई-वडिलांनी कष्टाने माझे शिक्षण पूर्ण केले. राज्य सेवा परीक्षेत मी ‘हॅट्ट्रिक’ घेतली. मागील वर्षी तहसिलदार पदासाठी माझी निवड झाली होती.अभिजित मेंगडे म्हणाला, मला पहिल्या प्रयत्नातच राज्य सेवा परीक्षेत यश मिळाले आहे. मी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी येथील आहे. परीक्षेत यशस्वी झालेल्या १३५ पैकी ८२ विद्यार्थ्यांनी द युनिक अकॅडमीमधून मार्गदर्शन घेतले असल्याचे अकॅडमीतर्फे कळविण्यात आले आहे. डीवायएसपी (पोलीस उप अधिक्षक) पदावर निवड झालेले सचिन कदम व सोनाली कदम हे दोघे बहीण-भाऊ आहेत. येत्या रविवारी यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार एमपीएससीचे माजी अध्यक्ष सुधीर ठाकरे यांच्या होणार आहे. एमपीएसीमधील यशस्वी उमेदवारसहायक संचालक / महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट-अ)मेनगाडे अभिजित आनंदराव, मारणे अश्विनी ज्ञानेश्वरउपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा (गट-ब)कुलकर्णी सतीश संजय, दश्वंत विशाल विश्वासराव, मुंदडा सागर चंदूलाल, भोईर निखिल शरद, सोळंकी सचिन नानाजी, आठवले तुषार अशोकरावसहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (गट-ब)डाके हर्षल नामदेवसहायक गटविकास अधिकारी (गट-ब) कल्हारे गोपाल उत्तमराव, सोनवणे तुषार राजाराम, पाटील प्रिया बाळासाहेबसहा. निबंधक सहकारी संस्था (गट-ब)सारडा पुष्पक राधाकिशनजी, मगर चंद्रकांत साहेबराव, डांगे सुप्रिया मारुतीउपअधीक्षक, भूमी अभिलेख (गट-ब)घायर ज्ञानेश्वर प्रल्हादरावनायब तहसीलदार (गट-ब)शिंंदे रोहन भीमराव, वराडे प्रवीणकुमार तुकाराम, राणे विकास सारंगधर, काकडे प्रज्ञा पद्माकर, नांदे सायली अप्पासाहेब, चौके नरेश तुकाराम.कक्ष अधिकारी (गट-ब)नलावडे प्रसाद शिवदास, शिंदे विक्रमसिंह प्रकाशराव, राठोड तुषार दिलीप, खताळे गणेश तुकाराम, दहिफळे बाबासाहेब सुदाम, जगताप अस्मिता गोपाल, निलंगे जिज्ञासा विलास, पठाण अंजुमबानो रशिदखान, चव्हाण प्रियंका चंद्रकांत, चौरी स्नेहा अजित.उपजिल्हाधिकारी (गट-अ) अहिरे भूषण अशोक, गायकवाड श्रीकांत शाहू, ढवळे संजयकुमार अच्युतराव, भस्के संदीप सदाशिव, बाफना नीलम भारतपोलीस उपअधीक्षक (गट-अ)ठाकूर अमोल नारायण, मांडवे अमोल अशोक, पाटील पूनम संभाजी, पालवे नीलेश श्रीराम, ढोले भाऊसाहेब कैलास, जाधव स्वप्निल चंद्रशेखर, भवर जयदत्त बबन, देशमुख नीलेश विश्वासराव, थोरबोले सचिन धोंडीबा, पंडित रोशन भुजंगराव, कुदळे प्रमोद दत्तात्रय, ढाकणे प्रिया मच्छिंद्र, गायकवाड राहुल सुभाष, गायकवाड पूजा बाळासाहेब, भारती अमोल रामदत्त, शेंडगे अश्विनी रामचंद्र, फडतरे कविता गणेश, कदम सोनाली तुकाराम, पाटील राजश्री संभाजीराव, पाटील सुदर्शन प्रकाश, जगताप अश्विनी रामदास, कदम सचिन तुकाराम.सहायक विक्रीकर आयुक्त गट - अभिसे दत्तात्रय सुखदेव, पोटे रवींद्र प्रल्हादराव, कांबळे अनंत, झाल्टे राहुल रामचंद्रउपमुख्य कार्यकारी अधिकारी / गटविकास अधिकारी (गट-अ)राऊत मनोज बापूराव, धनवडे किरणकुमार, पोळ प्रकाश लालासाहेब, नष्ठे अजयकुमार कल्याण, दिवणे समृद्धी लालाजी.मुख्याधिकारी, नगरपालिका/नगरपरिषद (गट-अ)जोशी सौरभ दत्तात्रय, गायकवाड हर्षल शरदतहसीलदार (गट-अ)भलगट्टीया गौरव, नऱ्हे रोहिणी दत्तात्रय, पाठक अमोल, निळे श्रीकांत रामचंद्र, वाकडे गोविंद, खाडे सचिन, धुलदर निखिल, पवार श्वेता सुरेश, मोरे सिद्धार्थकुमार जगन्नाथ, पवार चारुशीला बाबूराव, बिरादार संजय पुंडलिकराव