शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा राज्यभरात निषेध, पुरोगामी संघटना रस्त्यावर उतरल्या : विचारवंतांच्या खुनाचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 03:15 IST

कर्नाटकमधील ज्येष्ठ पत्रकार व पुरोगामी कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येचा राज्यातील विविध संघटनांतर्फे निषेध करण्यात आला. वैचारिक प्रतिवाद शक्य नसल्याने हिंसेचा मार्ग अवलंबला जात आहे, विचारवंतांच्या खुनाचे सत्रच सुरू झाले आहे

पुणे/मुंबई : कर्नाटकमधील ज्येष्ठ पत्रकार व पुरोगामी कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येचा राज्यातील विविध संघटनांतर्फे निषेध करण्यात आला. वैचारिक प्रतिवाद शक्य नसल्याने हिंसेचा मार्ग अवलंबला जात आहे, विचारवंतांच्या खुनाचे सत्रच सुरू झाले आहे, अशी भावना पुण्यातील निषेध सभेत व्यक्त करण्यात आली.दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्यानंतर लंकेश यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी पुरोगामी संघटना, चळवळीतील नेते, लेखक, विचारवंत, पत्रकार तसेच मोठ्या संख्येने पुणेकर एस. पी. महाविद्यालयाजवळ जमले होते. विद्या बाळ म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन तोंडांनी बोलतात. त्यांनी असहिष्णू प्रकारांचा निषेध केला पाहिजे. सीपीएमचे अजित अभ्यंकर म्हणाले, राज्यघटना उलथून टाकण्यासाठी अशा कृती केल्या जात आहेत. एक गट हत्या करणाºयांचा, एक विचारधारेचा आणि एक राजकारण्यांचा अशी समविभागणी करण्यात आली आहे. केवळ निषेध सभा घेऊन काहीही होणार नाही. आपल्याला लढा पुकारावा लागेल. महात्मा गांधी यांची हत्या ही पहिली राजकीय दहशतवादी हत्या होती.पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी यांचे मारेकरी सापडत नाहीत. मग कसले बहुमतातले सरकार, कसला पारदर्शी कारभार या देशात कष्टकरी, शेतकरी, कर्मचारी सर्वच अस्वस्थ असल्याचे चित्र असल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव पंढरपूर येथे म्हणाले.मुंबईत कँडल मार्चपत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेर्धाथ मुंबईतील पत्रकारांनी प्रेस क्लब बाहेर कँडल मार्च काढला़ यामध्ये ज्येष्ठ पत्रकार सहभागी झाले होते़ शहर व उपनगरात ठिकठिकाणी या हत्येचा निषेध नोंदवण्यात आला़ हत्येचे तीव्र पडसाद सोशल मीडियावर उमटले. फेसबुक, टिष्ट्वटर आणि व्हॉट्स अ‍ॅपवर चर्चांना उधाण आले. अनेकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून घटनेचा निषेध केला जात आहे. सध्या सोशल मीडियावर लंकेश यांची हत्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. प्रेस क्लबने या हत्येविरुद्ध रस्तावर उतरुन मेणबत्ती मोर्चा काढला.गौरी लंकेश हत्येच्या निषेधार्थ ठाण्यात मूक निदर्शने-ठाणे : ज्येष्ठ महिला पत्रकार गौरी लंकेश यांच्या बंगळुरू येथील निर्घृण हत्येच्या निषेधार्थ ठाणे स्टेशनबाहेरील सॅटीस पुलाखाली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, स्वराज्य इंडिया, श्रमिक जनता संघ, धर्मराज्य पक्ष अशा विविध संघटनांनी बुधवारी सायंकाळी मूक निदर्शने केली. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि कुलबुर्गी यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा लोकशाहीचा गळा घोटण्याचा घृणास्पद प्रकार भारतातील जातीयवादी व धर्मांध शक्तींनी केल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.

टॅग्स :Gauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरणGauri Lankeshगौरी लंकेशMurderखूनCrimeगुन्हा