शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

प्राध्यापक आजपासून कामावर रुजू होणार; सुधारित इतिवृत्तानंतर एमफुक्टोचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 01:45 IST

प्राध्यापक भरती, ७१ दिवसांच्या संप काळातील थकीत वेतन यांसह अन्य मागण्यांसाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेत तक्रार निवारण समितीच्या इतिवृत्तात अपेक्षित सुधारणा केल्या.

मुंबई : प्राध्यापक भरती, ७१ दिवसांच्या संप काळातील थकीत वेतन यांसह अन्य मागण्यांसाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेत तक्रार निवारण समितीच्या इतिवृत्तात अपेक्षित सुधारणा केल्या. परिणामी, गेले १६ दिवस राज्यभरात सुरू असलेले प्राध्यापकांचे काम बंद आंदोलन मागे घेण्याची अधिकृत घोषणा एमफुक्टोने केली.प्राध्यापक संघटनांनी कामबंद आंदोलन पुकारताच शासनाच्या तक्रार निवारण समितीने संघटनांसोबत चर्चा सुरू केली होती. या बैठकीत गतवेळच्या इतिवृत्तात प्राध्यापकांच्या हाती ठोस काही देण्यात आले नव्हते. त्यामुळे नाराज प्राध्यापकांनी आंदोलन पुढेही सुरूच ठेवले. विद्यार्थी हिताचा मुद्दा उपस्थित करीत समितीने पुन्हा एकदा मागण्यांवरील चर्चेअंती सुधारित इतिवृत्त मंत्रालयाद्वारे प्रकाशित केले. त्यानंतर बैठकीअंती महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स आॅर्गनायझेशन (एमफुक्टो) या प्राध्यापकांच्या संघटनेने नवीन इतिवृत्तावर समाधान व्यक्त करीत संप मागे घेतला. गुरुवारपासून राज्यातील सर्व प्राध्यापक कामावर रुजू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.संप मागे घेण्यात आल्यानंतर आता एमफुक्टोकडून १२ तारखेला विद्यापीठांवर निदर्शने करण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी जिल्ह्यातील घटक संघटनांचे शिष्टमंडळ आपापल्या विद्यापीठांच्या कुलगुरूंची भेट घेऊन सुधारित इतिवृत्त आणि बुधवारच्या बैठकीतील निर्णयांचे निवेदन देणार असल्याचे एमफुक्टोच्या अध्यक्षा ताप्ती मुखोपाध्याय यांनी सांगितले.असे आहेत शिक्षणमंत्र्यांचे निर्देश- एमफुक्टोच्या अनेक मागण्यांवर शिक्षणमंत्र्यांनी नवीन इतिवृत्तात सकारात्मक निर्देश दिले आहेत.- ७१ दिवसांच्या संप काळातील प्राध्यापकांनी उशिरा का होईना परीक्षांचे काम पूर्ण केले. त्यामुळे विभागाकडून वित्त विभागाला परत केलेली रक्कम परत घेऊन त्यातून प्राध्यापकांचे वेतन देणार असल्याचे सुधारित इतिवृत्तात नमूद आहे.- विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयातील सेवकासाठी शुल्क नियंत्रण समितीला तशी रचना करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे संस्थेने प्राध्यापकांना आॅनलाइन वेतन दिल्ल्याची खात्री होऊ शकेल.- सातवा वेतन आयोग लागू होण्यासाठी उच्च शिक्षण विभागामार्फत विशेष कक्ष उभारून २०१९ पूर्वी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात येईल. जेणेकरून केंद्राकडून आलेली थकबाकी प्राध्यापकांना लवकरात लवकर देण्यात येईल.

टॅग्स :Professorप्राध्यापकMaharashtraमहाराष्ट्र