शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

समीरचे रुद्र पाटीलशी व्यावसायिक संबंध

By admin | Updated: September 21, 2015 01:15 IST

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात अटक केलेला सनातनचा साधक समीर गायकवाड आणि मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार संशयित रुद्र पाटील या दोघांमध्ये व्यावसायिक संबंध होते.

सुशांत कुंकळयेकर, मडगावकॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात अटक केलेला सनातनचा साधक समीर गायकवाड आणि मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार संशयित रुद्र पाटील या दोघांमध्ये व्यावसायिक संबंध होते. २00६पर्यंत ते सांगलीत भागीदारीने मोबाइलचे दुकान चालवित होते. त्यामुळे हत्येचा मास्टरमाइंड रुद्र असण्याची शक्यता पोलीस पडताळून पाहत आहेत.२00९च्या मडगाव बॉम्बस्फोटानंतर समीरची एनआयएने चौकशी केली. त्यानंतर मालकाने समीरकडून दुकान काढून घेतले. रोजीरोटी नसल्यामुळे त्याने ‘सनातन’चे काम सुरू केले, असे ‘सनातन’शी संबंध असलेले अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी सांगितले.पानसरे यांच्या हत्येनंतर त्याने कित्येकांशी फोनवरून संपर्क साधला होता. यावरूनच पोलीस समीरपर्यंत पोहोचले. पुनाळेकर यांच्या म्हणण्याप्रमाणे, समीरला फोन बदलायची सवय होती. त्याशिवाय तो थापाड्याही होता. याच सवयीमुळे तो गोत्यात आला. पानसरे हत्येसंदर्भात भक्कम पुरावे हाती लागले असल्याचे पोलीस ठामपणे सांगत आहेत. परंतु, अद्याप पोलिसांनी गायकवाड सोडून कोणालाही अटक केलेली नाही. ज्योती कांबळे व एक नातेवाईक गेले पाच दिवस चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. परंतु त्यांना अटक केली नसल्याने पोलिसांच्या तपासाची नेमकी दिशा स्पष्ट होऊ शकलेली नाही. समीरला अटक केल्यानंतर सांगली पोलिसांनी त्याच्या घराची व दुकानाची झडती घेतली. या वेळी २३ मोबाइल, रॅम्बो चाकू, ‘सनातन’ धर्माची २० पुस्तके, कॅप, भित्तीपत्रके, हिशेबाच्या पावत्या, लग्नपत्रिका, बँकेचे पासबुक, डायरी आदी साहित्य ताब्यात घेण्यात आले. हे संपूर्ण साहित्य पोलिसांनी जप्त करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ताब्यात दिले होते. रविवारी सकाळी गुन्हे अन्वेषण शाखेने हा मुद्देमाल राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांच्या ताब्यात दिल्याचे सूत्रांनी सांगितले.कोल्हापूर : कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला ‘सनातन’चा साधक समीर गायकवाड याच्यासह त्याची प्रेयसी ज्योती कांबळे व नातेवाईक अशा तिघांकडे कोल्हापूर पोलिसांसह पुणे सीबीआय व कर्नाटकातील सीआयडी पथक कसून चौकशी करीत आहे. तर, राजारामपुरी पोलिसांनी रविवारी समीरच्या सांगलीतील घरातून जप्त केलेले साहित्य सीलबंद करून ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.पोलिसांना धमकी आध्यात्मिक दृष्टिकोनातूनपुणे : ‘सनातन प्रभात’ने पोलिसांनाच धमकीवजा इशारा दिला असल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर राज्यात त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. त्यामुळे सनातनने एक पाऊल मागे घेत संकेतस्थळावर खुलासा प्रसिद्ध केला आहे. आम्ही पोलिसांना आध्यात्मिक शिक्षा करणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी सनातनचा साधक समीर गायकवाड याच्या नातेवाइकांचा पोलीस नाहक छळ करीत असल्याचा सनातन संस्थेचा आरोप आहे. यासंदर्भात मुखपत्र ‘दैनिक सनातन प्रभात’च्या संकेतस्थळावर मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात ‘साधकांचा छळ करणाऱ्या पोलिसांची नावे सनातनने प्रसिद्ध केली असून, त्यांना हिंदू राष्ट्रात कठोर साधना करण्याची शिक्षा केली जाईल,’ असे म्हटले आहे. ही पोलिसांसाठी धमकीच असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते.याचे तीव्र पडसाद उमटत असल्याचे निदर्शनास येताच सनातनने बचावात्मक पवित्रा घेत संकेतस्थळावर खुलासा प्रसिद्ध केला. ‘पोलिसांना शिक्षा करणार’ हे विधान आम्ही आध्यात्मिक अंगाने केले असल्याचे यात म्हटले आहे. आध्यात्मिक कार्यासाठी व्यक्तींची नावे का प्रसिद्ध करावी लागतात, अशी कुठल्याही प्रकारची शिक्षा करण्याचा अधिकार सनातनला कोणी दिला, याबाबत यात काहीही भाष्य करण्यात आलेले नाही.पुणे : राज्य शासनाने सनातन संस्थेवर यापूर्वीच बंदी घातली असती तर डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे व डॉ. एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्या टाळता आल्या असत्या. राज्य शासनाने आता तरी सनातनबाबतची भूमिका जाहीर करावी, अशी मागणी डॉ. दाभोलकर यांच्या कन्या व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांनी रविवारी केली.डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला दोन वर्षे एक महिना पूर्ण झाला आहे. प्रत्येक महिन्याच्या २० तारखेला अंनिसचे कार्यकर्ते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर एकत्र जमून दाभोलकर यांचे मारेकरी पकडण्याची मागणी करीत आहेत. मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, ‘सनातन प्रभात’ या वृत्तपत्रामधून गेल्या ५ ते ६ वर्षांपासून सातत्याने अंनिस व डॉ़ दाभोलकर यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह लेखन प्रसिद्ध केले जात होते. दाभोलकर यांना उघड उघड धमक्या दिल्या जात होत्या. मडगाव बॉम्बस्फोटातील आरोपीने ‘अंनिसच्या लोकांना मारले पाहिजे,’ अशी भाषा वापरली होती. पोलिसांनी त्याचवेळी याची गांभीर्याने दखल घेऊन सनातन संस्थेवर बंदी आणली असती तर दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्या रोखता आल्या असत्या, असे त्यांनी सांगितले.