शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

मोहात पाडतील ‘मोहा’ची उत्पादने; बंधनमुक्त केले, आता ‘ब्रँड’ही करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 05:48 IST

‘ॲन ॲपल अ डे, कीप्स डॉक्टर अवे’ अशी इंग्रजीत एक म्हण आहे. मात्र, राज्यातील आणि विशेषत: विदर्भातील जंगलात मोहफुल हे असे एक वनोपज आहे, ज्यात या सफरचंदापेक्षाही अधिक पौष्टिक घटक आहेत, असे संशोधक सांगतात. पण गावठी दारूचा ठपका बसल्याने ते बदनाम झाले. मोहफुलांपासून निर्मित जॅम, सरबत, लाडू यांना असलेली मागणी बघितली तर त्याची प्रचंड आर्थिक क्षमता लक्षात येते.

मनोज ताजने

गडचिरोली : निसर्गाने भरभरून वनवैभव देऊनही नियमांच्या बंधनामुळे वर्षानुवर्षे जंगलालगत राहणाऱ्या आदिवासींच्या जीवनमानात कोणताही बदल झाला नाही. ‘उशाशी राहूनही उपाशीच’ अशी त्यांची अवस्था आहे. मात्र, आता महत्त्वाचा वनोपज असलेल्या मोहफुलांवरील काही बंधने राज्य शासनाने शिथिल केली आहेत. त्यामुळे आदिवासींच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरावे. राज्याचे तत्कालीन वन सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने २०१७ मध्ये केलेल्या शिफारशीच्या आधारे मोहफुलांना बंधनमुक्त करण्यासाठी ४ मे २०२१ ही तारीख उजाडली. 

मोहफुलांची खरेदी, गोळा करणे आणि वाहतूक यावरील निर्बंध मागे घेतले आहेत. तसेच मोहफुलांची साठवणूक, विक्री व व्यापार करण्याकरिता एमएफ-२ परवान्यात वार्षिक कोट्याची मर्यादा ५०० क्विंटलपर्यंत मर्यादित झाली आहे. शिवाय हा परवाना आता केवळ आदिवासी सदस्य असलेल्या आदिवासी विकास संस्था, महिला बचत गट, सहकारी संस्था किंवा ग्रामपंचायत अशा मान्यताप्राप्त संस्थांनाच मंजूर केला जाणार आहे.

या निर्णयामुळे आदिवासींच्या आर्थिक विकासाचा मार्ग प्रशस्त झाला आहे. पण त्यासाठी आदिवासी बचत गटांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आणि मोहापासून तयार होणाऱ्या आरोग्यवर्धक पदार्थांचे ब्रँडिंग होणे गरजेचे आहे. मोहफुलात व्हॅल्यू ॲडिशन करून विविध पदार्थ निर्मिती केल्यास कोट्यवधींचे उत्पन्न मिळू शकते. - सुधीर मुनगंटीवार, माजी वनमंत्री.

हे पौष्टिक पदार्थ होतात तयारमोहफुलांपासून जॅम, सरबत, लाडू, चटणी, वनस्पती तूप, साबण, बायोडिझेल असे अनेक पदार्थ तयार होतात. गडचिरोलीत वन विभागाच्या पुढाकाराने गोंडवाना हर्ब्स प्रक्रिया केंद्रामार्फत काही पदार्थ तयार होतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्युट्रिशन, हैदराबादच्या संशोधनानुसार, मोहफुलांमध्ये सफरचंद, केळी, आंबा, मनुका यांच्या तुलनेत जास्त प्रमाणात प्रथिने, तंतुमय पदार्थ, कॅल्शियम, कर्बोदके आणि इतर पौष्टिक घटक असतात.

वर्षाकाठी ४०० कोटींची मोहफुलेविदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि अमरावती जिल्ह्यांसह धुळे आणि ठाणे जिल्ह्यात मोहफुलांचे उत्पादन होते. सध्या गोळा होतात, त्यापेक्षा जास्त मोहफूल आतील जंगलातून गोळा केले जाऊ शकतात. खारगे समितीच्या अहवालानुसार राज्यात सव्वालाख मेट्रिक टन मोहफुलांची उत्पादन क्षमता आहे. त्याची किंमत ४०० कोटींच्या घरात जाते.

उद्योगाला संधीचंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी, गोंडपिपरी, बल्लारपूर, मूल आणि सावली या तालुक्यातील जंगलामध्ये भरपूर मोहाची झाडे आहेत. मोहफुलांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. 

रोजगाराच्या संधी गोंदिया जिल्ह्यात मार्च ते मे या कालावधीत ग्रामीण भागातील नागरिक तेंदुपत्यासह मोहफुलांचे संकलन करतात. यामुळे अनेक कुटुंबांना रोजगार मिळतो. 

२० कोटींची उलाढालप्रक्रिया उद्योग सुरू झाल्यास भंडारा जिल्ह्यात २० कोटींची उलाढाल होऊ शकते. औषधीयुक्त असल्यामुळे मोहफूल वृक्षलागवड चळवळ राबविण्याची गरज आहे.