शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

महिला-बालविकासच्या योजनांवर गंडांतर; ३३ टक्के निधी अपुरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 05:09 IST

यदु जोशी। लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : समाजातील शेवटच्या घटकांच्या कल्याणासाठी योजना राबवित असलेले सामाजिक न्याय, आदिवासी विकास आणि ...

यदु जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : समाजातील शेवटच्या घटकांच्या कल्याणासाठी योजना राबवित असलेले सामाजिक न्याय, आदिवासी विकास आणि महिला व बालकल्याण हे विभाग ३३ टक्केच निधी खर्च करण्याच्या वित्त विभागाच्या बंधनाने हैराण झाले असून काही योजनांवर निधीअभावी गंडांतर येण्याची शक्यता लक्षात घेऊन आता ही मर्यादा काढा, अशी मागणी या विभागांमार्फत करण्यात आली आहे.

तिन्ही विभागांच्या मंत्र्यांनी ३३ टक्क्यांची मर्यादा हटविण्यासाठी वित्तमंत्री अजित पवार यांना साकडे घातले आहे. या मर्यादेमुळे माझी कन्या भाग्यश्री, अंगणवाडी सेविकांसाठीची भाऊबीज, बेबी केअर किट आदी योजनांसाठीचा निधी द्या नाहीतर योजना चालविणे कठीण जाईल, असा अहवाल एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी विभागाच्या सचिवांना दिला आहे.शासकीय रुग्णालयांमध्ये प्रसुति झालेल्या महिलांना मुलगा वा मुलीसाठी १ हजार ९९५ रुपये किमतीचे एक बेबी केअर किट दिले जाते. त्यात १७ प्रकारच्या वस्तू असतात. या किटच्या पुरवठ्यापोटी ७९ कोटी ९९ लाख रुपयांपैकी पुरवठादारास ४४ कोटी ७४ लाख रुपये अदा करण्यात आले पण ३५ कोटी २५ लाख रुपये देणे बाकी असून ते न दिल्यास पुरवठादार न्यायालयात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे आयुक्तांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ही योजना निधीअभावी स्थगित ठेवता येणार नाही असा अभिप्रायदेखील आयुक्तांनी दिला आहे.

१ आॅगस्ट २०१७ नंतर जन्मलेल्या एका मुलीच्या नावावर ५० हजार रुपये आणि एका कुटुंबात दोन मुलींचा जन्म झाल्यास प्रत्येकी २५ हजार रुपये मुदतठेवीत १८ वर्षांपर्यंत ठेवली जाते. या योजनेला आणि मुदतठेवीलाही कालमर्यादा असल्याने योजनेसाठी नियमितपणे निधी देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने ८.२५ कोटी रुपयांची तरतूद करणे आवश्यक आहे. मुलींचा जन्मदर वाढावा यासाठीची ही योजना बंद केल्यास मुलींच्या जन्मदरावर विपरित परिणाम होऊ शकतो याकडे आयुक्तांनी लक्ष वेधले आहे.राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनीसेविका, मदतनीस यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची भाऊबीज विभागातर्फे दरवर्षी दिली जाते. ही योजना स्थगित ठेवता येणार नाही. त्यासाठी यंदा ४२ कोटी रुपयांची गरज भासणार आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीसांना देण्यात येणाऱ्या विमासंरक्षणासाठी आवश्यक रकमेची तरतूद करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

टॅग्स :women and child developmentमहिला आणि बालविकास