शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खासगीकरणाची 'लाइन कट', फडणवीसांच्या आश्वासनानंतर वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 06:18 IST

वीज कंपन्यांना समांतर वीज परवाना देऊ नये म्हणून सरकार ठामपणे आपली बाजू वीज नियामक आयोगाकडे मांडेल, असा शब्दही त्यांनी दिल्यानंतर ३२ वीज संघटनांनी संप मागे घेण्याची घोषणा केली.

मुंबई : तिन्ही सरकारी वीज कंपन्यांचे खासगीकरण केले जाणार नाही. उलट, पुढील तीन वर्षांत सरकारी वीज कंपनीत ५० हजार कोटींची गुंतवणूक केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज कर्मचारी संघटनांना दिली. वीज कंपन्यांना समांतर वीज परवाना देऊ नये म्हणून सरकार ठामपणे आपली बाजू वीज नियामक आयोगाकडे मांडेल, असा शब्दही त्यांनी दिल्यानंतर ३२ वीज संघटनांनी संप मागे घेण्याची घोषणा केली.

राज्य सरकारच्या मालकीच्या वीज कंपन्यांचे खासगीकरण आणि अदानी वीज कंपनीला महावितरणच्या कार्यक्षेत्रात वीज वितरणाचा समांतर परवाना देण्याच्या धोरणाविरोधात राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समितीने तीन दिवसांचा राज्यव्यापी संप पुकारला होता. बुधवारी संपाच्या पहिल्याच दिवशी वीज वितरण व्यवस्था अनेक ठिकाणी कोलमडली. मुंबईत सह्याद्री अतिथिगृहावर फडणवीस आणि संपकरी संघटनांच्या नेत्यांच्या दोन बैठकांनंतर संप मागे घेण्यात आला.

समांतर खासगी परवानाही रोखणार■ अदानी वीज कंपनीने महावितरणचे महसुली कार्यक्षेत्र असलेल्या नवी मुंबई, ठाणे परिसरात वीज वितरण करण्यासाठी समांतर खासगी परवाना मिळावा म्हणून राज्य वीज नियामक आयोगाकडे (एमईआरसी) केलेला अर्जही कारणीभूत ठरला आहे. यावरही फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.जेव्हा एमईआरसी याबाबत अधिसूचना काढेल, त्यावेळी असा परवाना देऊ नये म्हणून सरकार ठामपणे आपली बाजू मांडेल. सरकारकडील आयुधांचा वापर करून समांतर खासगी परवाना रोखला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

बैठकीत सरकारने दिलेली आश्वासने■ महावितरणच्या कार्यक्षेत्रात समांतर वीज विरणाचा परवाना देण्यासाठी खासगी कंपन्यांना विरोध केला जाईल, वीज नियामक आयोगाने तसा प्रयत्न केला तर सरकार विरोध करेल. ■ कंत्राटी व आऊटसोर्सिंगच्या कर्मचायांना सामाजिक सुरक्षा दिली जाईल.■ रिक्त जागा भरताना कंत्राटी कामगारांना अधिक गुण देवून सामावून घेण्याचे धोरण तयार केले जाईल.■ कोणताही जलविद्युत प्रकल्प खासगी कंपन्यांना देणार नाही.

समन्वय वाढवू नफ्यातील विभाग खासगी कंपनीला देणे योग्य नाही. त्यामुळे या कंपन्यांपुढील संकट वाढेल. सरकारी कंपनीच्या हिताचाच निर्णय एमआरसीच्या माध्यमातून झाला पाहिजे, असे राज्य सरकारचे स्पष्ट धोरण आहे. संघटनेचेही तेच म्हणणे आहे. परंतु, समन्वयाअभावी हा प्रश्न निर्माण झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

राज्य सरकारला आपल्या तीनही कंपन्यांचे कुठलेही खासगीकरण करायचे नाही. त्यामुळे खासगीकरण करण्याचा प्रश्नच येत नाही, ओडिशा, दिल्ली येथे जवळपास पन्नास टक्के खासगीकरण झाले असले तरी तसे महाराष्ट्रात करण्याचा आमचा कोणताही विचार नाही.- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस