शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाबाबत सरकार अप्रामाणिक, पृथ्वीराज चव्हाण यांची सरकारवर टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 14:15 IST

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका अप्रामाणिक दिसत आहे. आरक्षण द्यायला जमत नसेल तर त्यांनी संपूर्ण मराठा समाजाची माफी मागावी व हा फक्त निवडणुकीपुरता जुमला होता हे सांगावे, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी पत्रकार परिषदेत टीकास्त्र सोडले.

 कोल्हापूर - मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका अप्रामाणिक दिसत आहे. आरक्षण द्यायला जमत नसेल तर त्यांनी संपूर्ण मराठा समाजाची माफी मागावी व हा फक्त निवडणुकीपुरता जुमला होता हे सांगावे, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी पत्रकार परिषदेत टीकास्त्र सोडले. अरबी समुद्रातील शिवस्मारकाची उंची कमी करण्यामागील हेतु काय? याबाबत त्यांनी सरकारबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

कोल्हापूर दौ-यावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. पावसाळी अधिवेशनात विविध प्रश्न उपस्थित केल्याचे सांगत त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर टीकास्त्र सोडले.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने उचललेली पावले ही फसवी आणि अप्रमाणिक आहेत. त्यामुळे पुढे काय होईल हे सांगता येत नाही. मराठा आंदोलकांची दिशाभूल करुन हा प्रश्न निकाली निघणार नाही. तसेच धनगर समाजालाही एक आठवड्यात आरक्षण देतो म्हणाले होते. परंतु चार वर्षे होत आली तरी काहीच झालेले नाही. आरक्षणासह शेतकरी कर्जमाफी, दुध, साखर याबाबतचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत.ते पुढे म्हणाले, अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाबाबत सरकारने हातचलाखी केली आहे. हा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केल्यावर मुख्यमंत्र्यांनी फसवाफसवीची उत्तरे दिली. शिवछत्रपतींच्या पुतळ्याची उंची १६० मीटरवरुन कमी करुन ती १२६ मीटर केली आहे. पूर्वीच्या प्रस्तावाला मान्यता असताना पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेल्या भूमिपूजनानंतर हा प्रस्ताव बदलून उंची कमी करण्यात आली. त्यामागील कारण मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेले नाही. इंदू मिल स्मारकाचे फक्त भूमिपूजन झाले असून पुढे काहीच झालेले नाही. सरकार फक्त निवडणूक ते निवडणूक काम करत आहे का? याबाबत विचारले असता मुख्यमंत्री उत्तरे देत नाहीत. तसेच विधी मंडळात बोलायला वेळ मिळत नाही. अध्यक्षांकडून तो दिला जात नाही. सरकारचे धोरण हे ग्राहक धार्जिणे व उत्पादक विरोधी असून यासाठी एक साखळीच कार्यरत आहे. यावेळी महापौर शोभा बोंद्रे, अ‍ॅड. सुरेश कुराडे, जि.प.सदस्य राहुल पाटील उपस्थित होते.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण