शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातकडून धडे घेण्याची महाराष्ट्रावर नामुश्की - पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 06:36 IST

रोजगार, गुंतवणुकीबाबत राज्य सरकारच्या घोषणा फसव्या असल्याचे आता केंद्र सरकारनेच मान्य केले आहे. उद्यमशील तरुणांना स्टार्टअप कंपन्यांच्या उभारणीसाठी ठोस मदत करण्याऐवजी पोकळ घोषणा आणि आश्वासने दिली.

मुंबई : रोजगार, गुंतवणुकीबाबत राज्य सरकारच्या घोषणा फसव्या असल्याचे आता केंद्र सरकारनेच मान्य केले आहे. उद्यमशील तरुणांना स्टार्टअप कंपन्यांच्या उभारणीसाठी ठोस मदत करण्याऐवजी पोकळ घोषणा आणि आश्वासने दिली. केंद्र सरकारने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार स्टार्टअप कंपन्यांच्या धोरण अंमलबजावणीबाबत देशातील विविध राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा क्रमांक पहिल्या १५ मध्येही नाही, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.आझाद मैदान येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, महाराष्ट्राला स्टार्टअप कॅपिटल करू, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. गुंतवणुकीबाबतच्या अनेक फसव्या घोषणांप्रमाणे मुख्यमंत्र्यांची ही घोषणाही फसवी ठरली. खुद्द केंद्रानेचतसा अहवाल दिला. शिवाय, स्टार्टअप धोरण कसे राबवावे यासाठी प्रगत गुजरातकडून धडे घ्यावेत, असे निर्देशही केंद्राने महाराष्ट्राला दिले आहेत. राज्यांची कामगिरी मोजण्यासाठी ३८ निर्देशांक ठरविले होते. त्यातील १७ निर्देशांकात कोणतेच काम झाले नसल्यामुळे महाराष्ट्राने माहितीच पाठविली नाही. या अहवालात गुजरातला १०० गुण मिळाले तर, महाराष्ट्र मात्र तळाशी आहे. राज्यात फडणवीस सरकार आल्यापासून सातत्याने उद्योगाचा विकासदर घटत आहे. मागील चार वर्षांत राज्यातील एकूणच औद्योगिक धोरणात फक्त जाहिराती आणि मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र यांसारख्या इव्हेंटचा भरणा झाला. याचा परिणाम वाढत्या बेरोजगारीत दिसून येत आहे, असे चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणMaharashtraमहाराष्ट्र