क-हाड (जि. सातारा) : ‘भाजप सरकारने ८९ लाख शेतक-ºयांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी देऊ, असे आश्वासन दिले. प्रत्यक्षातदहा लाख शेतक-यांनाच कर्जमाफी दिली जात आहे. भाजप सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. शेतकºयांना रामभरोसे सोडले आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे पत्रकार परिषदेत केला़ चव्हाण म्हणाले, शेतक-यांच्या कर्जमाफीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सुरूवातीपासूनच विरोध आहे. हे आम्ही सांगत आलो आहे. कर्जमाफी अर्ज भरण्यासाठी सरकारने लावलेल्या अटी व शर्तींमुळे शेतकरी अगोदरच संतापला आहे. आता तर सरकारने एकप्रकारे शेतक-यांवर अविश्वासच दाखवलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षात शेतकºयांचे शेतीचे उत्पन्न दुप्पट करू, असे आश्वासन दिले होते. ते आता पोकळ ठरले आहे.नारायण राणे यांच्याबाबत विचारले असता पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘काँगे्रस सोडल्यानंतर नारायण राणे भाजपाचे अमितशहा यांना भेटण्यासाठी दिल्ली येथे गेले. त्यावेळी त्यांना अनेक मार्गातून अपमानीत करण्यात आले. ते करायला नको हवे होते. आज राणे पक्षात नाहीत, याचे दु:ख होत आहे.
शेतक-यांना सरकारने रामभरोसे सोडले - पृथ्वीराज चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 04:21 IST