शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकांसमोर आव्हान तंत्रज्ञान क्षेत्राचे - पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 03:57 IST

जागतिक स्तरावर झपाट्याने बदलत असलेल्या तंत्रज्ञानाचा सर्व क्षेत्रांवर परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे, उद्योग क्षेत्रासमोरही तंत्रज्ञानाचे मोठे आव्हान आहे.

मुंबई : जागतिक स्तरावर झपाट्याने बदलत असलेल्या तंत्रज्ञानाचा सर्व क्षेत्रांवर परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे, उद्योग क्षेत्रासमोरही तंत्रज्ञानाचे मोठे आव्हान आहे. तंत्रज्ञान क्षेत्राचा ज्या वेगाने विस्तार होतोय त्याप्रमाणे रोजगारावरही परिणाम होतो आहे. हा धोका चीन आणि अमेरिकेसारख्या देशाने वेळीच ओळखून आपल्या उद्योग धोरणांत बदल केले आहेत. त्याप्रमाणे आपणही वेळीच आपल्या उद्योग क्षेत्राच्या धोरणांत बदल केला पाहिजे. राज्यातही नवउद्योजकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी इको सिस्टीम तयार केली पाहिजे, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.पु. ल. देशपांडे अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये शनिवारी सकाळी युक्ती मीडिया आयोजित आणि साहिब रिअ‍ॅल्टी प्रस्तुत ‘लोकमत आदर्श उद्योजक पुरस्कार २०१८’ सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, ज्येष्ठ दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, लक्ष्यवेध संस्थेचे संस्थापक अतुल राजोळी आदी उपस्थित होते. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते लघू व मध्यम उद्योगक्षेत्रातील १२ होतकरू उद्योजकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या वेळी अतुल राजोळी यांनी ‘युक्ती उद्योगाची’ या विषयावर उद्योजकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण खोत यांनी केले.याप्रसंगी चव्हाण म्हणाले की, मीही उद्योजक म्हणून सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर राजकारणात आलो. परंतु, इंजिनीअरिंगच्या क्षेत्रात शिक्षण घेतल्यानंतर नोकरी शोधण्याचा अनुभव मीही घेतला आहे. राज्यात उद्योजक क्षेत्रासाठी पोषक वातावरण तयार केले पाहिजे. केंद्र शासनाच्या माहितीनुसार गेल्या चार वर्षांत उद्योग क्षेत्रातील आपले स्थान १०-११ व्या स्थानी आहे. त्यामुळे याकरिता शासनाने प्रयत्न केले पाहिजेत. या सोहळ्यात येऊन कित्येक वर्षांनंतर आता उद्योग क्षेत्राबाबत मराठी माणसाची मानसिकता बदलतेय हे पाहून आनंद झाला. सन्मानित झालेले उद्योजक लवकरच ‘उद्योगपती’ होतील अशी आशा आहे. समारोपाप्रसंगी चव्हाण यांच्या हस्ते सोहळ््यास सहकार्य करणारे प्रायोजक साहिब रिअ‍ॅल्टीजचे प्रशांत किणी, लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटचे अतुल गोरे, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे प्रदीप मांजरेकर, जोश इव्हेंट्सचे रुपेश सुर्वे, वंडर बी क्रिएटिव्ह सोल्यूशन्सच्या अजिता महाजन, युक्ती मीडियाच्या अर्चना सोंडे आणि प्रमोद सावंत तसेच पोटले फोटोग्राफीचे अमित पोटले यांचा गौरव करण्यात आला.हे आहेत पुरस्कारविजेतेअमित आचरेकर (संचालक - वा कॉर्पोरेशन), उज्ज्वला बाबर (संचालिका - माऊली असोसिएट्स), आशुतोष ठाकूर (संचालक - सौर इंजिनीअर अ‍ॅण्ड कन्सल्टन्ट प्रा.लि.), आनंद शेट्ये (संचालक - रंगशलाका), चित्रलेखा वैद्य (संचालिका - वर्षासूक्त प्रा. लि.), परशुराम शिवणकर (संचालक - यश कन्स्ट्रक्शन्स), महेश वाघ (संचालक - ई-किडा प्रा.लि.), मंदार पाटील (संचालक - पाटील मॅजिक्स), रमेश गुरव (संस्थापक - लक्ष्मी मेकॅनिकल अ‍ॅण्ड इंजिनीअर कंपनी), सचिन पाटील (संस्थापक/ संचालक सचिन्स स्टुडिओ), सागर जोशी (संस्थापक - आरएसए आॅटो आयकेअर प्रा.लि.) आणि श्रीकृष्ण पाटील (संचालक - अप्रमश्री आॅटोमेशन्स प्रा.लि.) या उद्योजकांना सोहळ्यात गौरविण्यात आले.एकाच संकल्पनेला उद्योगसमर्पित करा - अतुल राजोळीआज आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय पातळीवर अनेक उद्योग समूह १००-१५० हून अधिक वर्षे टिकून आहेत आणि दिवसागणिक आणखी प्रगती करीत आहेत. या उद्योग समूहांकडून नवउद्योजकांनी प्रगतीचा मूलमंत्र शिकला पाहिजे. नामांकित आणि कायम प्रगतिपथावर असलेले अनेक उद्योग समूह केवळ एका संकल्पनेवर वर्षानुवर्षे प्रचंड मेहनत आणि चिकाटीने काम करत आहेत.आजचे नवउद्योजक केवळ आजच्या दिवसाचा विचार करतात किंवा आकडेमोड वाढविण्याच्या मागे लागलेले असतात. त्यामुळे एकाच वेळी समृद्ध आणि श्रीमंत होण्यासाठी एकच संकल्पना गाठीशी ठेवून त्यावर कृतिशील अंमलबजावणी करून उद्योगाचा आलेख उंचावला पाहिजे. उद्योग क्षेत्रात नव्याने येणाऱ्या तरुण पिढीने दूरगामी विचार करून या क्षेत्रात यावे असा मोलाचा सल्ला दिला.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणMaharashtraमहाराष्ट्र