शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चांगले वर्तन असलेल्या कैद्यांची शिक्षा होणार माफ; स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 05:38 IST

केवळ क्षणिक राग, मोहातून केलेल्या गुन्ह्याबाबत राज्यभरातील कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या  कैद्यांसाठी एक खूश खबर आहे.

जमीर काझी अलिबाग :

केवळ क्षणिक राग, मोहातून केलेल्या गुन्ह्याबाबत राज्यभरातील कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या  कैद्यांसाठी एक खूश खबर आहे. तुरुंगातील त्यांच्या वागणुकीच्या आधारावर त्यांना शिक्षेतून विशेष माफी मिळणार आहे. देश स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृह विभागाने ही विशेष योजना राबविली आहे. त्यासाठी विशिष्ट प्रवर्गाच्या कैद्यांची पात्रता तपासण्यासाठी राज्य सरकारने समितीची स्थापना केली आहे. गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या समितीकडून त्यावर महिनाभरात शिक्कामोर्तब केले जाणार आहे. 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारंभ देशभरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त एखाद्या कृत्यामुळे आयुष्यभर शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनी गुन्हेगारी जीवन सोडून देशाचे जबाबदार नागरिक बनावे, या हेतूने विशिष्ट प्रवर्गाच्या कैद्यांना विशेष माफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

यावर्षी १५ ऑगस्ट आणि पुढील  वर्षात २६ जानेवारी व १५ ऑगस्ट रोजी त्यांना मुक्त केले जाणार आहे. त्याबाबत गृह विभागाकडून आलेल्या निर्देशानुसार माफीसाठीची पात्रता व निकष तपासण्यासाठी राज्य सरकारने  समिती बनवलेली आहे. गृह विभागाचे  अपील व सुरक्षा विभागाचे अपर मुख्य सचिव त्याचे अध्यक्ष असून विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव आणि राज्याच्या कारागृह व सुधार सेवा तुरुंग अपर पोलीस महासंचालक समितीत सदस्य असतील. या माफी योजनेतील निकषाप्रमाणे ते एखाद्या कैद्याची तुरुंगातील शिस्त, आचरण निश्चित करून माफीसाठीची पात्रता निश्चित करतील.

राज्यात ९ मध्यवर्ती, ३१  जिल्हा, १९ खुले  व १७२ दुय्यम तुरुंग  आहेत. त्याशिवाय मुंबई आणि पुण्यामध्ये महिलांसाठी स्वतंत्र जेल आणि पुणे व अकोलामध्ये महिलांसाठी खुले  तुरूंग आहेत.

केंद्राच्या योजनेनुसार शिक्षा भोगत असलेल्या  कैद्यांची पात्रतेची निश्चिती  वरिष्ठांच्या समितीकडून केली जाईल. त्यांच्या अहवालानुसार कैद्यांची शिक्षा माफ केली जाणार आहे.- सतेज पाटील (गृहराज्यमंत्री, शहर)

६,६०० शिक्षाधीन कैदी राज्यातील  कारागृहात  ३१ मे अखेरपर्यंत सिद्धदोष बंदीची एकूण संख्या ६,६०० इतकी आहे, त्यामध्ये २४४ महिला व दोन तृतीयपंथी  असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी