पनवेल : खारघरमधील तळोजा मध्यवर्ती कारागृहात अंकुश अशोक काटकर (२१) या कैद्याने कारागृहाच्या मैदानात असलेल्या विहिरीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे शनिवारी उघडकीस आले. विहिरीवरील लोखंडी जाळी दगडाने तोडून विहिरीत उडी मारण्याच्या प्रयत्नात असताना कारागृहातील सुरक्षारक्षकांनी त्याला रोखल्यानंतर ही घटना उघडकीस आली.नैराश्यामुळे कैद्याने हे पाऊल उचलले असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेत अंकुश हा किरकोळ जखमी झाला असून उपचारासाठी त्याला सरकारी रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास खारघर पोलीस करीत आहेत. तळोजा कारागृहात नजीकच्या काळात अशाप्रकारचे आत्महत्येचे अनेक प्रयत्न झाले असून काही कैद्यांनी आत्महत्या करून जीवन संपवल्याच्या घटना यापूर्वीही तळोजा मध्यवर्ती कारागृहात घडल्या आहेत. (प्रतिनिधी)
कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Updated: April 6, 2015 03:30 IST