शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
5
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
6
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
7
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
8
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
9
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
10
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
11
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
12
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
13
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
14
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
15
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
16
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
17
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
18
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
19
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
20
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन

पोलिसांवर हल्ला करून कैदी फरार.

By admin | Updated: December 9, 2014 01:18 IST

पन्हाळ्यात भरदिवसा थरार : पोलिसांच्या डोळ्यांत चटणी फेकली; एक पोलीस रक्तबंबाळ

कोल्हापूर : जन्मठेपेच्या प्रकरणातील कैदी बंदोबस्तासाठी असलेल्या दोघा पोलिसांच्या डोळ््यात चटणीपूड टाकून व त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून तिघा साथीदारांच्या मदतीने बेड्यांसह दुचाकीवरून पळून गेल्याची घटना आज, सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. बापू बिरू प्रकरणाची आठवण करुन देणारा हा प्रकार पन्हाळ्यावरील भाडेकर बोळ परिसरात घडला. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली. रात्री या प्रकरणातील मोटारसायकल पोलिसांना कोडोली परिसरातील उसात सापडली. विजय ऊर्फ बबलू संजय जावीर (वय ३५, रा. कारंडे मळा, शहापूर, इचलकरंजी) असे पळून गेलेल्या कैद्याचे नाव आहे. तिघा साथीदारांच्या मदतीने तो पळून गेला आहे. हे साथीदार कोण आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी हेड कॉन्स्टेबल अशोक गंगाराम कोरवी (वय ४८, रा. पोलीस वसाहत, कोल्हापूर) व पोलीस नाईक जावेद गौस पठाण (३२ रा. पोलीस लाईन, जुनी वसाहत, कोल्हापूर) यांच्यावर पन्हाळ््यातच प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यांच्याकडून रात्री उशिरापर्यंत जाबजबाब घेण्याचे काम सुरू होते. पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंकित गोयल, शाहूवाडीचे प्रभारी उपअधीक्षक किसन गवळी यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना केली. घडले ते असे : कैदी विजय जावीर हा सध्या बिंदू चौक सबजेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी आहे. त्याने कोतोली (ता. पन्हाळा) येथील सराफास लुटल्याप्रकरणी २०१३ मध्ये त्याच्यावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाची पन्हाळ्यातील प्रथमवर्ग न्यायालयात आज सुनावणी होती. त्यासाठी मुख्यालयातील दोघे पोलीस आज सकाळी जावीरला सबजेलमधून ताब्यात घेऊन एस.टी.तून पन्हाळ््यास गेले. एस. टी. स्टँडवर उतरल्यानंतर बेड्यासह जावीर मध्यभागी व दोघे पोलीस दोन्ही बाजूला असे ते चालत निघाले होते. स्टँडवरून भाडेकर बोळातून कोर्टाकडे जाण्याचा हा मधला मार्ग आहे. त्यामध्ये रस्त्यांतच थोड्या पायऱ्या लागतात. या मार्गाने जावीरला पोलीस नेतात याची माहिती त्याला होती. त्यामुळे त्याच्या पाठोपाठ त्याचे तिघे साथीदार दोन मोटारसायकलवरून एस.टी.च्या पाठीमागून पाठलाग करत आले होते. पायऱ्या चढत जात असताना त्या साथीदारांनी येऊन पोलिसांच्या डोळ््यात चटणी टाकून त्यांना बाजूला ढकलले. तेवढ्यात जावीर याने बेड्यासह हाताला हिसडा दिला. पोलिसांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता जावीर ने हेडकॉन्स्टेबल कोरवी यांच्या नाकावर बेड्यासह ठोसा दिल्याने ते रक्तबंबाळ झाले. एक सहकारी रक्ताने माखलेले पाहून दुसरे पोलीसही काहीसे भांबावून गेले. इतक्यात ते चौघेही पायऱ्यांवरून खाली पळत आले. रस्त्यावरच त्यांनी मोटारसायकली लावल्या होत्या. त्यावर बसून ते पसार झाले. काही कळायच्या आतच हा प्रकार घडला. पोलिसांच्या तावडीतून कैदी पळून गेल्याची वार्ता गडावर पसरताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. सांगली पोलिसांकडून ‘मोक्का’ सांगली : विजय ऊर्फ बबलू जावीर यास सहा महिन्यांपूर्वी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली होती. इचलकरंजीत तरुणाच्या खूनप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा लागली होती. शिक्षा भोगत असताना तो पॅरोल रजेवर बाहेर आला होता. रजा संपल्यानंतर तो पुन्हा कारागृहात हजर न होता फरार झाला. त्याने स्वतंत्र टोळी तयार करुन सराफांना लुटण्याचे गुन्हे करण्यास सुरुवात केली. सांगली जिल्ह्णात त्याने चार लूटमारीचे गुन्हे केले आहेत. सहा महिन्यांपूर्वी त्याच्यासह सहा जणांना अटक केली होती. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी या सहाजणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांना सादर केला होता. रितेशकुमार यांनी त्यास मंजुरीही दिली होती. मोक्का कारवाईखाली तो सध्या कारागृहात होता. (प्रतिनिधी) पोलीसच अनभिज्ञ विजय जावीर हा कोणत्या खूनप्रकरणी शिक्षा भोगत होता, याची माहिती कळंबा मध्यवर्ती कारागृहास विचारला असली असता, त्यांनी इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांशी संपर्क साधण्यास सांगितले. शिवाजीनगर पोलिसांशी संपर्क केला असता, त्यांनी पन्हाळा पोलिसांशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यामुळे तो नेमका कोणत्या खूनप्रकरणाशी शिक्षा भोगतो, याची माहिती नसल्याचे स्पष्ट झाले. शिरगावे खून प्रकरणातील कैदी विजय जावीर हा शहापूर येथील रहिवाशी असून, तो गुंडप्रवृत्तीचा होता. सुमारे चार वर्षांपूर्वी विक्रमनगर येथे झालेल्या इम्तियाज शिरगावे याच्या खून प्रकरणात तो आरोपी आहे. येथील शहापूर-कारंडे मळा येथे वाढदिवसाचा डिजिटल फलक लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यवसान शिरगावे याच्या खुनामध्ये झाले होते. त्यामध्ये जावीर यास जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तुरूंगात असताना अन्य आरोपींबरोबर आलेल्या संपर्कामुळे त्याची गुंडगिरीची पार्श्वभूमी वाढली. दरम्यान, तो पॅरोलवर सुटला असताना फरार झाला होता. जावीरवरील गुन्हे जाविर याच्यावर पोलीस कब्जातून मारहाण करून पळून नेणे असा भारतीय दंडविधान (कलम ३३३), सरकारी कामात अडथळा (कलम ३५३) व साथीदारांसमवेत कट (कलम २२४ व २२५) असा गुन्हा दाखल झाला आहे. थरारक पाठलाग प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक पंकज शिरसाट हे शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या संघर्ष यात्रेचा बंदोबस्त करून वाघबिळातून पन्हाळ््याकडे येत होते. त्यांना तातडीने कैदी पळून गेल्याचा मेसेज देण्यात आला. नेमके याचवेळी जावीर हा आरोपी हातातील बेड्यासह मोटारसायकलीवरून पळून निघाल्याचे शिरसाट यांच्या गाडीतील पोलिसांनी पाहिले. त्यांनी जावीरला ओळखले. पोलिसांनी लगेच त्याचा पाठलाग सुरू केला. त्याचवेळी त्याचे अन्य दोघे साथीदार मोटारसायकलवरून कोल्हापूरकडे पळून जाण्यात यशस्वी झाले, तर कोडोली पोलीस ठाण्याच्या अलीकडील बाजूस कॅनॉलमध्ये गाडी टाकून जावीर उसातून पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी त्या परिसराची नाकाबंदी केली. त्या परिसरात रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता. पथके रवाना विजय जावीरसह त्याच्या साथीदारांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, इचलकरंजी, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पथके रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी दिली. पन्हाळ्यावरील घटनेचा अहवाल तातडीने मागविला आहे. तो उद्या, मंगळवारी माझ्याकडे येईल. त्यानंतर संबंधित प्रकरणातील दोषी असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. - डॉ. मनोजकुमार शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक, कोल्हापूर. पोलीसच झाला फितूर विजय जावीर पळून जाण्यामध्ये एका कॉन्स्टेबलचा हात असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे. त्याला बिंदू चौक कारागृहातून पन्हाळा पोलीस ठाण्यापर्यंत घेऊन जाताना कुठे हल्ला करायचा याची पूर्वसूचना ‘त्या’ कॉन्स्टेबलने दिल्याचे समजते. पन्हाळा पोलिसांनी पोलीस अधीक्षकांना पाठविलेल्या अहवालामध्ये संबंधित कॉन्स्टेबलचे नाव असून त्याला निलंबित करण्याची शिफारस करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजले. त्यामुळे उद्याच या पोलिसावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. बापू बिरुच्या आठवणी झाल्या ताज्या २० ते २२ वर्षांपूर्वी बापू बिरू वाटेगांवकर कोल्हापूर-सांगली हा एस.टी.बस मधून मजले खिंडीत (ता. हातकणंगले) येत असताना शिगांव परिसरातील गुंड रवी पाटील याने आपल्या साथीदारांसह रस्त्यावरच ही एस.टी.बस अडवली. त्यावेळी बंदुकीचा धाक दाखवून बापूला पळवून नेले होते. त्याला कोल्हापुरातील जिल्हा न्यायालयात एका खटल्यासाठी नेताना ही घटना घडली होती. यावेळी पसार झालेला बापू वाटेगांवकर, रवी पाटील आदींना सांगली जिल्ह्याचे तत्कालिन पोलीस अधीक्षक रामराव वाघ यांनी त्यांच्या मुसक्या आवळून ‘टाडा’ लावला होता.