तळोजा : तळोजा एमआयडीसीतील उल्का सीफूड कोल्ड स्टोरेज या कंपनीवर कामगार अधिकारी व पोलिसांच्या पथकाने मारलेल्या धाडीत १५० हून अधिक कामगार ताब्यात घेण्यात आले आहेत. यामध्ये बालकामगारांचाही समावेश आहे. कामगार अधिकारी व पोलिसांना सीफूड कंपनीत बालकामगार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून १५० हून अधिक कामगार ताब्यात घेण्यात आले आहेत. मात्र यातील बालकामगार किती याचा अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. फॅक्टरी निरीक्षक व कामगार अधिकारी याविषयी माहिती घेत आहेत. या कंपनीची व ठेकेदाराची कसून चौकशी पोलीस करत आहेत. हे कामगार कुठून आलेत त्यांची पडताळणी करण्याचे काम पोलीस करीत असल्याची माहिती परिमंडळ दोनचे सहायक पोलिस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी दिली. रात्री उशीरापर्यंत याविषयी कार्यवाही सुरू होती. (वार्ताहर)
तळोज्यातील सीफूड कंपनीवर छापा
By admin | Updated: July 19, 2014 03:09 IST